style 
लाइफस्टाइल

फॅशन-पॅशन : एव्हरग्रीन पफ स्लिव्हज 

ऋतुजा कदम

कपड्यांची फॅशन ही एका कोण्या व्यक्तीसाठी मर्यादित नसते. सर्वसाधारण व्यक्ती ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वजण ती फॅशन करू शकतील अशापद्धतीने ती तयार केली जाते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या काही स्टाईल किंवा फॅशनला आपण ‘एव्हरग्रीन’ असे म्हणतो. एखादी स्टाईल काही वर्षांनी पुन्हा काहीशा बदलांसह ट्रेंडमध्ये येते. सध्या ‘पफ स्लिव्हज’ची फॅशन सगळीकडेच पाहायला मिळतेय. या फॅशनविषयी अधिक माहिती जाणून घेऊया... 

पफ स्लिव्हज 
स्लिव्हसचा उदय अठराव्या शतकापासून झाला. खांद्यापासून कोपरापर्यंत ड्रेसचे हात फुगीर, अशी त्याची रचना असे. काही काळाने मागे पडलेली ही फॅशन पुन्हा एकोणिसाव्या शतकात पाहायला मिळाली. अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये २०००नंतर ही स्टाईल आवर्जुन दिसे. नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये या स्टाईलचे अनेक प्रयोग पाहायला मिळाले. पफ स्लिव्ह्ज म्हणजे कपड्यांच्या बाहुंचे फुगीर हात. या पफ स्लिव्हजमध्ये ड्रेस आणि टॉप दोन्ही मिळतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- नुकत्याच ट्रेंडमध्ये असलेल्या टॉप आणि ड्रेसचे पफ स्लिव्हज हे नेटचे पाहायला मिळत आहेत. नेटचे पफ हात तुम्हाला पार्टीवेअर तसेच क्लासिक लुक देण्यास मदत करतात. 

- पफ स्लिव्हसच्या टॉपमध्ये मुख्यत: दोन प्रकार आढळतात. एकाचा गळा संपूर्ण बंद असतो तर, दुसऱ्या प्रकारामध्ये गळा मोठा आणि खोल असतो. प्रसंगानुरूप यामधील प्रकार निवडावा. 

- पफ स्लिव्ह्ज आकर्षक असतात. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी या प्रकाराचा टॉप परिधान केल्यास सर्वांचे लक्ष वेधून घेतले जाईल. 

- ऑफिसपासून पार्टीपर्यंत कोणत्याही ठिकाणी हा टॉप घालता येऊ शकतो. ही स्टाईल सर्वांपेक्षा वेगळा आणि हटके लुक देण्यास मदत करते. 

- या टॉपसोबत शक्यतो पेन्सिल, हायवेस्ट किंवा स्लिम फिट अशा प्रकाराची जीन्स किंवा पॅन्ट घालावी. पॅरेलल किंवा बॅगी पॅंट घालू नये. 

- गळा बंद असल्यास मोठे कानातले आवर्जुन घालावे. गळा मोठा आणि खोल असल्यास गळ्यातले नाजूक आणि कानातले छोटे घाला. 

- सध्या सेलिब्रिटींपासून सोशल मीडियावरील ब्लॉगर्सना या ट्रेंडने वेड लावले आहे. नेट पफ स्लिव्हजच्या टॉपला सर्वाधिक पसंती पाहायला मिळतेय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''आम्ही उघडपणे वाल्मिकअण्णांचं समर्थन करतो, त्यात चुकीचं काहीही नाही'', बॅनर झळकलेला संदीप तांदळे नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर

Viral: 'ये हिरो डोक्याची गोळी घे पण ऑफिसला ये' बॉस आणि कर्मचाऱ्याचं चॅट व्हायरल, म्हटला...'काही झालं तरी...'

ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा; स्मृती मानधनालाही नामांकन

LAL KITAB PREDICTION 2025 : राहूमुळे तुमची शांतता होणार भंग ! 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, जाणून घ्या मासिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT