Sai Baba esakal
लाइफस्टाइल

Sai Baba : साईबाबा आणि लोकमान्य टिळकांच्या भेटीला १०५ वर्ष पूर्ण, कसा होता तो प्रसंग?

या पुण्य भेटीची साक्ष असलेली शाल आजही उपलब्ध आहे

Pooja Karande-Kadam

Sai Baba : शिर्डी येथील साईबाबा मंदिर जगप्रसिद्ध आहे. या मंदिरात देश-विदेशातील लोक साईबाबांचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करण्याच्या आशेने येतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि गोवा एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. 

या दरम्यान पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा केली. महाराष्ट्रातील शिर्डी तीर्थक्षेत्राला दरवर्षी लाखो लोक भेट देतात.  या मंदिराशी आणि साईबाबांच्या जीवनाशी संबंधित काही चमत्कार खूप प्रसिद्ध आहेत.

शिर्डीच्या साईबाबांचा आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या भेटीचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. त्याबद्दल साईभक्त दादासाहेब खापर्डे यांनी तो प्रसंग शब्द संग्रहीत करून ठेवला आहे. त्यानुसार, दादासाहेब खापर्डे व लोकमान्य हे संगमनेर येथील संत वाड्यात थांबले होते.

खापर्डे आपल्या डायरीत लिहितात की, सकाळी 8.30 वाजता वकील संत यांच्या घरी पानसुपारी झाल्यावर आम्ही निघालो.  

सकाळी दहावाजता शिर्डीत पोहचलो. तेथे निवासाची व्यवस्था दीक्षित वाड्यात करण्यात आली होती. त्यावेळी तिथे माधवराव देशपांडे, बापूसाहेब बुट्टी, नारायण पंडित, बाळासाहेब भाटे, बापूसाहेब जोग व इतर नोकर उपस्थित होते.

सर्वजण मशिदीत गेल्यानंतर तेथे साईबाबांना वंदन केले. बाबांना दक्षिणा दिली. सर्वांनी येवल्याला पुढील कामासाठी जाण्याची परवानगी मागितली. त्यावर बाबा म्हणाले, वाटेत उष्म्याने मरायला जावेसे वाटते का? इथे तुम्ही तुमचे जेवण करा. त्यानंतर वातावरणात गारवा वाटू लागल्यानंतर निघा.

बाबांच्या आदेशानंतर माधवराव देशपांडे यांच्या घरी जेवण केले. विश्रांती घेऊन मशिदीत गेलो. बाबा पहुडले होते. ते झोपले असे वाटले. लोकांनी लोकमान्यांना पानसुपारी दिली. मग परत मशिदीत गेलो. बाबांनी उदी दिली. निघण्याची अनुमती दिली. त्यानुसार पुढील प्रवास सुरू केल्याचे नमूद करण्यात आले.

या पुण्य भेटीची साक्ष असलेली शाल

साईबाबा आणि लोकमान्य टिळक यांची भेट झाली. तेव्हा दोघांनीही शाल देऊन एकमेकांचा सत्कार केला. एकमेकांप्रती असलेली भक्ती जाहीर केली. तेव्हा वापरण्यात आलेली शाल आजही तेव्हा वापरण्यात आलेली शाल आजही उपलब्ध आहे. बाबा आणि लोकमान्य यांच्या सत्कारात उपयोगात आणलेली शाल शामा यांच्याकडे देण्यात आली.

 ती शाल पुढच्या पिढीने देवस्थान समितीकडे सुपूर्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT