Sarva Pitru Amavasya 2024 | solar eclipse Sakal
लाइफस्टाइल

Sarva Pitru Amavasya 2024 : सुर्य ग्रहण अन् सर्वपित्री अमावस्या एकाच दिवशी, काय करावे अन् काय नाही, वाचा सविस्तर

Sarva Pitru Amavasya 2024: हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येला खुप महत्व आहे. या दिवशी अनेक लोक पितरांची पूजा करतात. या दिवशी पितृपक्ष संपणार आहे. तसेच याच दिवशी सूर्य ग्रहणही लागणार आहे. यामुळे कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Sarva Pitru Amavasya And Solar Eclipse: हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येला खुप महत्व आहे. यंदा सर्वपित्री अमावस्या २ ऑक्टोबरला असून याच दिवशी सूर्य ग्रहण लागणार आहे. तसेच या दिवशी पितृपक्ष संपणार आहे. ज्या लोकांना पितरांचे निश्चित तारिख माहिती नसते ते लोक सर्वपित्री अमावस्येला पितरांचे श्राद्ध करतात. पण याच दिवशी सूर्यग्रहण लागत असल्याने काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये.

कोणत्या वेळी श्राद्ध करू नये?

सर्वपित्री अमावस्येला सकाळी किंवा रात्री श्राद्ध करू नका. पितृपक्षात श्राद्ध दुपारी करावे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नये.

श्राद्ध कोणी करावे?

पितरांचे श्राद्ध नेहमी मोठ्या मुलाने करावे.मुलगा नसेल तर पत्नी करू शकते. लहान भावाने श्राद्ध करणे अशूभ मानले जाते.

कोणती भांडी वापरावी?

सर्वपित्री अमावस्येला लोकंडी आणि स्टीलची भांडी वापरू नका. तुम्ही पितळीची भांडी वापरू शकता तसेच द्रोण वापरू शकता. पितरांना दिलेले अन्न देवाला चुकूनही दाखवू नका.

तर्पण करावे

सर्वपित्री अमावस्येला पितरांची पूजा करताना तीळ वापरू नका. तुम्ही काळ्या तीळाचा वापर करू शकता.

पुढील गोष्टीही ठेवा लक्षात

  • गरज नसल्यास प्रवास करणे टाळा

  • सर्वपित्री अवस्येला कोणतेही महत्वाचे काम करू नका.

  • तसेच सूर्यग्रहण असल्याने मंदिरात जाणे टाळावेय.

  • या दिवशी खोटे बोलणे टाळावे.

  • मोठ्या लोकांशी वाद घालू नका.

  • पिपृक्षाचा शेवटचा दिवस असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावे.

  • कारण या दिवशी पृथ्वीवरून पितर जातात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT