Sarva Pitru Amavasya 2023 esakal
लाइफस्टाइल

Sarva Pitru Amavasya 2023 : पितृदोषापासून मुक्तीसाठी सर्वपित्री अमावस्येला करा या झाडांची पूजा, निश्चित फळ मिळेल

काही वृक्षांची पूजा केल्याने यातून सुटका होऊ शकते

Pooja Karande-Kadam

Sarva Pitru Amavasya 2023 : एका मध्यमवर्गीय घरात सगळं काही सुरळीत सुरू होतं. मुलीचं लग्न ठरण्याच्या बेतात होतं. अन् मुलगाही नोकरीत परमनंट होणार होता. पण, या दोन्ही गोष्टी लांबत चालल्या होत्या. परमनंट होणार पण लेटर हातात येत नाही, अन् सगळं पसंत होतं तरी मुलीसाठी होकार अद्याप येत नाही.

या समस्येवर तोडगा काढण्याची वेळ आली तेव्हा ज्योतिषांनी पितृदोष मागे लागल्याचे सांगितले. पितृशांती हा एकमेव उपाय त्यावर होता. पितृशांती ही नदीघाटावर तिन दिवस करण्यात येते. पण शांती न करताही या त्रासातून मुक्ती मिळू शकते, कशी ती पाहुयात.

प्रसिद्ध ज्योतिषी राधाकांत वत्स यांनी आम्हाला सांगितले की पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी खूप पैसे गुंतवणे आणि काही मोठे उपाय करणे आवश्यक नाही. काही वृक्षांची पूजा केल्याने, त्यांच्याशी संबंधित काही उपाय केल्यानेही यातून सुटका होऊ शकते.

ज्योतिषी राधाकांत वत्स यांनी तीन वृक्षांची नावे सांगितली. ज्यांची पूजा केल्याने पितृदोष सहज दूर होऊन त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो.

पिंपळ वृक्ष

सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कुटुंबात जेवढे सदस्य असतील तेवढी नाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळांमध्ये पुरून टाकावीत. यानंतर पितृ शांती मंत्र 'ओम पितृ गणय विद्महे जगत्धारिने धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात्।' ५१ वेळा जप करावा. ज्यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो.

काही नाणी या झाडाच्या मुळात पुरावीत

अशोकाचे झाड

सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अशोक वृक्षात सूर्यदेव वास करतो आणि सूर्य पितृदोषाचा कारक मानला जातो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी सर्व पितरांसाठीचे दिवशी पाच दिवे घेऊन ते दिवे अशोक वृक्षाजवळ ठेवावे. आणि पितरांचे स्मरण करावे. त्यांनी या दोषातून मुक्त करावे अशी विनंतीही त्यांना मनोभावे करावी.  

अशोक वृक्षात सूर्यदेव वास करतो

आंब्याचे झाड

आंब्याचे झाड सर्व अशुभ शक्ती दूर करते, असे सांगितले आहे. यामुळेच आंब्याची झाडे किंवा पाने शुभ कार्यात वापरली जातात. कारण ते सर्व प्रकारचे दोष दूर करतात. त्यामुळे या दिवशी आंब्याच्या झाडाची पूजा अवश्य करा. आंब्याच्या झाडाची पूजा करून त्याला फुले प्रसाद अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी.

आंब्याचे झाड सर्व अशुभ शक्ती दूर करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

Sonipat Highway Accident : ढाब्यावर जेवण करून परतताना कार-ट्रकचा भीषण अपघात; तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, एकाची प्रकृती गंभीर

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

SCROLL FOR NEXT