Pitru paksha 2023  Esakal
लाइफस्टाइल

Sarva Pitru Amavasya2024: सर्व पितृ अमावस्येला ब्राह्मणाला 'या' गोष्टी करा दान, दूर होतील आर्थिक समस्या

Sarva Pitru Amavasya: सर्व पितृ अमावस्या हा पितृ पक्षाचा शेवटचा दिवशी आहे. पितरांना निरोप देण्याचाही हा दिवस आहे. या दिवशी लोक ब्राह्मणांना अन्नदान करतात आणि इतर गोष्टी दान करतात.

Puja Bonkile

Sarva Pitru Amavasya 2024: आज सर्व पितृ अमावस्या असून आज पितृ पक्षाचा शेवटचा दिवस आहे. मान्यतेनुसार 15 दिवसांत पुर्वज पृथ्वीवर येतात आणि अमावस्येला निरोप घेतात. 3 ऑक्टोबरला शारदीय नवरात्री सुरू होणार आहे.

पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये लोक त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंड दान आणि तर्पण यासारखे विविध प्रकारचे विधी करतात. असे मानले जाते की सर्व पितृ अमावस्येला ब्राह्मणांना अन्नदान आणि काही वस्तू दक्षिणा म्हणून दान केल्यास आर्थिक समस्या दूर होतात.

आज 2 ऑक्टोबर 2024 रोजी पितृ पक्षाचा शेवटचा दिवस आहे. याला सर्व पितृ अमावस्या, पितृ विसर्जनी अमावस्या, पितृ मोक्ष अमावस्या, पितृ अमावस्या आणि महालय असेही म्हणतात. आज सर्व पितृ अमावस्येला ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून पुढील गोष्टी दान करू शकता.

ब्राम्हणांना अन्नदान करा

धार्मिक विधी करणाऱ्या 5,7,9 किंवा 11 ब्राह्मणांना आमंत्रित करा आणि त्यांना अन्नदान करा. आपल्या क्षमतेनुसार दान करू शकता. जेवण करताना ब्राह्मणांनी दक्षिणाभिमुख असावे. तसेच त्यांना स्टील, प्लॅस्टिक आणि काच यांसारख्या भांड्यांमध्ये जेवण देण्याऐवजी पितळ, पितळ किंवा पान इत्यादींच्या ताटात त्यांना जेवण द्यावे.

सर्व पितृ अमावस्येला पितरांना भोजन देणे, पूजाविधी करणे, दान देणे ही कामे दुपारपर्यंत पूर्ण करावीत. हे काम सूर्यास्तानंतर करणे अशुभ मानले जाते.

पुढील वस्तू करा दान

आजच्या दिवशी फळं, भाज्या, धान्य, मिठाई, भांडी, कपडे किंवा पैसे ब्राह्मणांना दक्षिणा स्वरूपात देऊ शकता. असे केल्याने सुख आणि सौभाग्य वाढते आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT