CNG Kit for Diesel Car Esakal
लाइफस्टाइल

CNG Kit for Diesel Car: डिझेल वाहनात सीएनजी किट बसवता येईल का?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसुचना जारी करत BS6 कारमधील नवीन CNG/LPG रेट्रोफिटमेंट नियमांबद्दल माहिती दिली आहे. यात ३.५ टनपेक्षा कमी वजनाच्या कारमध्ये डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये सीएनजी किट बसवता येईल हे नमूद केलं आहे

Kirti Wadkar

CNG Kit for Diesel Cars: देशात-पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. गगनाला भिडलेल्या इंधनाच्या किमतीमुळे कार चालकांच्या खिशाला कात्री लागतेय. यामुळेच आता अनेक कार चालक आपल्या गाडीत CNG किट बसवून घेऊ लागले आहेत.

तसचं अनेक ऑटोमोबाईल कंपन्यादेखील CNG फिटेड कारचे मॉडल्स लॉन्च करत आहेत. या गाड्यांना देखील सध्या मोठी मागणी आहे. मात्र ज्यांच्याकडे जुन्या पेट्रोल आणि डिझेल कार आहेत. त्यांना इंधनावरील खर्च परवडत नसल्याने ते कारमध्ये CNG किट बसवून घेत आहेत. Save Fuel Automobile Marathi News You can fit CNG kit in Diesel Car

पेट्रोल आणि डिसेलच्या तुलनेत CNG गॅसची किंमत कमी आहे. याशिवाय या पर्यायामुळे प्रदूषणही कमी होतं. यापूर्वी सरकारने केवळ बीएस-४ BS4 किंवा त्याहून आधीच उत्सर्जन मानक असलेल्या गाड्यांनाच Cars सीएनजी किट बसवण्याची अनुमती दिली होती. त्यामुळे ज्यांनी बीएस६ गाड्यांची खरेदी केली होती.

अशा कार चालकांकडे CNG बसवण्याचा पर्याय नव्हता. मात्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ सालच्या अखेरीस एक अधिसुचना जारी करत बीएस-६ वाहनांमध्ये CNG/LPG रेट्रोफिटमेंट किट बसवण्यास मान्यता दिली. याचाच अर्थ जर तुमच्याकडे BS6 डिझेल कार असेल तरी तुम्ही आता त्यात CNG किट बसवून पैसे वाचवू शकता.Installing CNG kit in diesel car 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसुचना जारी करत BS6 कारमधील नवीन CNG/LPG रेट्रोफिटमेंट नियमांबद्दल माहिती दिली आहे. यात ३.५ टनपेक्षा कमी वजनाच्या कारमध्ये डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये सीएनजी किट बसवता येईल हे नमूद केलं आहे.

Rules for installing CNG in diesel car या अधिसुचनेनुसार रेट्रोफिटमेंटसाठी कार मालकाला ज्या आरटोओमध्ये वाहन रजिस्टर केलं आहे त्या आरटीओची परवानगी घ्यावी लागेल. सीएनजी हे पर्यावरणासाठी अनुकूल इंजिन असल्याचं अधिसुचनेत म्हटलं आहे. 

हे देखिल वाचा-

CNG किट बसवण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी

तुम्हाला तुमच्या डिझेल कारमध्ये किंवा बीएस-६ कारमध्ये सीएनजी किट बसवायचं असेल तर त्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.

प्रत्येक कारमध्ये CNG किट बसवता येतच अस नव्हे. यासाठी तुम्ही तुमच्या भागातील एरिया ट्रासंपोर्ट ऑफिस म्हणजेच RTO कार्यालयाला भेट द्या. ज्या गाड्यांना सीएनची किट बसवण्याची परवानगी आहे अशा गाड्यांची लिस्ट RTO कार्यालयाकडे उपलब्ध असते. त्यामुळे आधी आपली कार त्या लिस्टमध्ये आहे का हे तपासा.

बाजारात विविध कंपन्यांच्या CNG किटची सध्या स्पर्धा सुरू आहे.  यासाठी मान्यताप्राप्त डिलरकडूनच हे किट बसवून घ्यावं. त्यामुळे भविष्यातील धोका कमी होतो.

रेट्रोफिटेड सीएनजी किट बसवण्यासाठी सर्वात आधी RTO ची मंजूरी आवश्यक असते.  RTOच्या परवानगीशिवाय कारमध्ये सीएनजी किट बसवणं बेकायदेशिर आहे. यासाठी RTO कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये फ्यूल टाइपमध्ये अपडेट कराव लागतं. तुमच्या RCवप आरटीओ कार्यालयात फ्यूल बदलल्याचं सील लावलं जातं.

CNG पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त असतं. मात्र जर तुम्ही अधिकृत डिलरकडून तुमच्या कारच्या मॉडेलनुसार सीएनजी किट खरेदी करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला ५० ते ६० हजारांपर्यंच खर्च येऊ शकतो. तसचं CNG कारचा मेंटेनंस हा पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत थोडा अधिक असतो.

आरटीओसोबतच तुम्हाला तुमच्या विमा कंपनीलादेखील याबद्दलची माहिती द्यावी लागेल. यासाठी कारचं रजिस्टेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स पॉलिसिची कॉपी, अटेस्टेड केवायसीची कॉपी विमा कंपनीत जमा करावी लागेल. त्यानंतर विमा कंपनी तुम्हाला विम्याचे नवीन प्रमाणपत्र देईल.

तुमच्या कारची पॉलिसी अपडेट करणंही महत्वाचं आहे. CNG किट बसवल्यानंतर पॉलिसी अपडेट नसेल तर एखाद्या अपघातावेळी विमा कंपनी विमा नाकारू शकते. 

आजही पेट्रोल पंपाच्या तुलनेत CNG रिफिल स्टेशनची संख्या तुलनेत कमी आहे. शिवाय यामुळे या स्टेशन्सवर वाहनांच्या मोठ्या रांगा अनेकदा पाहायला मिळतात. त्यामुळे तुमचा प्रवास प्लॅन करताना वाटेतील CNG पंपांची माहिती ठेवावी. 

अशा प्रकारे तुम्ही आता तुमच्या डिझेल कारमध्येही CNG किट बसवून घेऊ शकता. यामुळे पैशांची मोठी बचत होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT