Make Habit of this healthy food diet  esakal
लाइफस्टाइल

Senior Citizen Day: म्हातारपणात आजारमुक्त राहाण्यासाठी लावा खाण्याच्या या पाच सवयी

म्हातारवात खाण्याच्या या पाच सवयी लावल्यास मधुमेह आणि हृदयाच्या अनेक गंभीर आजांरापासून तुमचा बचाव होण्यास मदत होईल.

सकाळ डिजिटल टीम

विशिष्ट वयोगटात प्रवेश केला की शरीरात बरेच बदल होत असतात. त्यानुसार शरीराला आवश्यक पोषणाची गरज असते. वाढत्या वयानुसार शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. अशा वेळी जर का शरीराला योग्य आहार मिळाला तर बरेच आजार तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही.तसेच मधुमेह आणि हृदयाच्या अनेक गंभीर आजांरापासून तुमचा बचाव होण्यास मदत होईल. (Make Habit of this healthy food diet)

दरवर्षी २१ ऑगस्ट हा दिवस ज्येष्ठ नागरिक म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या वर्गातील लोकांच्या निरोगी प्रकृतीसंदर्भात काही टीप्स जाणून घेऊया. म्हातावयात रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्यामुळे वाढत्या वयाच्या आहारात विटॅमिन आणि आयरनयुक्त जेवणाचा समावेश असायला हवा. बीटा कॅरोटीन, विटॅमिन सी, विटॅमिन ई आणि झिंकयुक्त खाद्यपदार्थांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे तत्व असतात. याव्यतिरिक्त फुलगोबी, शिमला मिर्ची, पालक आणि वांगी यांसारख्या भाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

हे पदार्थ आहेत इम्युनिटी बूस्टर

आहारात केळी, मशरूम आणि ब्रोकली यांसारखे पदार्थ इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.

जांभळाच्या बिया, फ्लेक्स सिड्स आणि नट्स आहारात असावे.

ओमेगा ३ युक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने अल्जायमर सारख्या रोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

या सवयी लावाव्या

म्हातारवयात रोज ८-९ ग्लास पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने सर्दी किंवा फ्लूचा धोका कमी होतो. पाण्याव्यतिरिक्त सूप, नारळ पाणी, दूध, ग्रीन टी यांसारख्या गोष्टीही तुम्ही आहारात घेऊ शकता. सोडियमयुक्त खाद्य पदार्थ जसे सॉस, आलू चिप्स, क्योर मीट, आणि स्नॅक फूड म्हातारवयात शरीरासाठी चांगले नसतात. त्यांनी कमी मिठाचे खाद्यपदार्थ खावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT