लाइफस्टाइल

Sequins Saree : प्रत्येक पुरूषाला वाटतं आपल्या पत्नीने ही साडी नेसावी!

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या चित्रपटात किंवा सिरीअलमध्ये अभिनेत्रीला पाहुन कधीतरी आपल्याला वाटतं की तिच्यासारखं दिसावं. हा विचाक केवळ स्त्रीयाच करतात असे नाही. तर, पुरूषांनाही वाटतं की, आपल्या पत्नीनेही तशी साडी घालावी. तर,बाजारात सर्वांना वेड लावायाला सिक्विन साडी बाजारात आली आहे.

तुम्हाला साडी नेसायची आवड आहे. आणि तुम्हाला फंक्शन किंवा लग्नात साडी नेसायची आहे, पण जुन्या साडीला अनेक प्रकारे स्टाइल करूनही तुम्हाला कंटाळा आला आहे. नेहमीच्या काढपदर आणि टिपिकल काठपदर साड्या घालून कंटाळला असाल एक नवी कोरी करकरीत साडी घेण्याचा नक्की विचार करा.

सिक्विनची साडी खूपच सुंदर दिसते. बघताच क्षणी प्रेमात पडावं अशी हि सुंदर साडी आहे. अतिशय उत्तम आणि क्लासी कलरमधील ही साडी नेसल्यावर प्रत्येकजण तूमचे कौतूकच करेल. तूम्हालाही फॅन्सी साडी निवडायची असेल तर या अभिनेत्रींचा लुक कॉपी करा.  

पुरूषांना ही साडी प्रचंड आवडते. याचे कारण म्हणजे हि साडी घातल्यावर महिलांची स्लीम ड्रिम फिगर अधिकच उठून दिसते. बॉडी शेपही क्लासी दिसतो. त्यामूळेच प्रत्येक पुरूषाला वाटतं की आपल्या पत्नीने ही साडी घालावी आणि त्याच्यासोबत रोमॅंटीक डेटवर जावे.

सिक्विन साडीत मलायकाने केलेल्या क्लासी लुकची सर्वत्र चर्चा होती. तूम्हालाही पांढरा रंग आवडत असेल तर तुम्ही मलायका अरोरासारखी पांढरी आणि हिरवी सिक्विन साडी घालू शकता.

रिसेप्शन पार्टीत तुम्हाला वेगळे दिसायचे असेल तर मरून रंगाची सिक्विन साडी घाला. लूकवर काही वेगळा टच देण्यासाठी तूम्ही ब्लाउजसोबत लांब बाही घालू शकता.

राखाडी रंगाची ही ग्लिटर साडी खूपच सुंदर आहे. सिक्वेन्स वर्क असलेली ही जॉर्जेट साडी आहे. जी मॅचिंग ब्लाउज पीससह येते. ही साडी तुम्ही आरामात कॅरी करू शकता.

बजेटमध्ये येणारी महिलांसाठी ही साडी घालण्यास अतिशय आरामदायक आहे. जॉर्जेट फॅब्रिक असलेली ही साडी वजनाने खूप हलकी आहे. त्यामूळे ती तरूणींच्या पसंतीला उतरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Kolhapur LPG Tanker Accident : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर LPG Gas टँकर पलटी; चालक जागीच ठार, रात्री 10 नंतर 'या' मार्गावरील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Shendurwada Crime : अपहरण करून चालकास बेदम मारहाण; वाळुज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT