Healthy Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Sexual Health : संबंध ठेवण्याआधी प्या एक कप कॉफी, आनंद...

संशोधनानुसार समोर आलं आहे की, कॉफी प्यायल्याने सेक्स ड्राइव्ह वाढण्यास मदत होते.

सकाळ डिजिटल टीम

Coffee Benefits for Sexual Health : कॉफी आपला मूड फ्रेश करते. त्यामुळे काही लोक दिवसाची सुरुवात फ्रेश करण्यासाठी सकाळी उठल्यावर कॉफी पितात, काही दिवसभरात आलेला कंटाळा घालवण्यासाठी कॉफी पितात.

प्रमाणात कॉफी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. असं संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. शिवाय सेक्स करण्याआधी एक कप कॉफी घेतल्यास त्याचे जबरदस्त फायदे होतात असं संशोधनातून समोर आलं आहे.

इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोका कमी

जे पुरुष दिवसातून किमान एकदा कॉफी पितात त्यांना इरेक्टाइल डिस्फंक्शन होण्याची शक्यता कमी असते. सेक्स करण्यापूर्णी योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास ते व्हायग्रा म्हणून काम करू शकते.

मात्र हे तितके प्रभावी नाही. नवीन संशोधनातून समोर आलं आहे की, जे पुरुष दररोज ८५ ते १७० मिलीग्रॅम कॅफिनचे सेवन करतात त्यांना इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोका ४२ टक्क्यांनी कमी होतो.

स्टॅमिना वाढतो

कॉफी ही झटपट उर्जा वाढवणारे पेय आहे. बरेचजण प्री वर्कआउट सप्लिमेंट म्हणून कॉफीचे सेवन करतात. कॅफीनमुळे तुमचा स्टॅमिना वाढण्यास मदत होते. यामुळे त्याचा फायदा शारीरिक संबंध ठेवताना होऊ शकतो.

लैंगिक इच्छा वाढते

कॉफीमध्ये आढळणाऱ्या सुगंधामुळे पुरुषांचा ताण आणि तणाव कमी होतो. कॉफीच्या सुगंधामुळे मूडसुद्धा रिफ्रेश होतो. कॉफीच्या सेवनामुळे पुरुषांची लैंगिक इच्छा वाढते.

अति सेवन आरोग्यास हानीकारक

कॉफी प्रमाणातच प्यायला हवा. त्याचे अति सेवन आरोग्यास हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते दिवसातून ३ कप पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. नाहीतर निद्रानाशाचा आजार होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT