oily skin 1.jpg
oily skin 1.jpg 
लाइफस्टाइल

शहनाझ हुसेन यांच्या खास टिप्स; सुंदर त्वचा ठेवण्यासाठी होईल मदत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आरोग्याप्रमाणेच तुमचं सौंदर्यही जपायचं असेल तर ब्युटी एक्सपर्ट शहनाझ हुसेन यांच्या या खास टीप्स नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरतील. 


कलिंगडामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. आहारात कलिंगडाचा समावेश करण्यासोबतच चेहर्‍यावर किमान 20 मिनिटं कलिंगडाचा रस लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. 


केळं, सफरचंद, पपई, संत्र या फळांचा त्वचेचा पोत सुधारण्यास फयादा होतो. किमान अर्धा तास चेहर्‍यावर या फळांचा मास्क लावा. यामुळे त्वचेतील दाह कमी होण्यास मदत होते. मृत त्वचेचा थर कमी करण्यास तसेच चेहर्‍यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते. 


काकडी ही थंड प्रवृत्तीची असल्याने त्वचेतील दाह कमी करण्यास ती फायदेशीर आहे. काकडीच्या गरामध्ये दोन चमचे दूध पावडर, अंड्याचा पांढरा भाग मिसळून लावा. या पेस्टचा चेहर्‍यावर, मानेवर हलका थर पसरवा. सुमारे अर्धा तासाने मास्क सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. 


डोळ्यांवरील थकवा, डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी गुलाबपाण्यात भिजवलेला कापसाचा बोळा डोळ्यांवर ठेवा. यासोबतच टी बॅग्स देखील फायदेशीर ठरतील. आयपॅडसाठी भिजवलेले ग्रीन टीच्या बॅग़्स भिजवून, त्यातील थोडं पाणी काढून डोळ्यांवर ठेवा. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT