Shardiya Navratri 2024:  Sakal
लाइफस्टाइल

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्र 3 की ४ ऑक्टोबरला? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Shardiya Navratri 2024: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. हा सण नऊ दिवस साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार देवी पृथ्वीवर येतात. यामुळे या सणाला खास महत्व आहे.

Puja Bonkile

Shardiya Navratri 2024: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. हा सण नऊ दिवस साजरा केला जातो. नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते.

धार्मिक मान्यतेनुसार देवी पृथ्वीवर येतात. यामुळे या सणाला खास महत्व आहे. या दिवसांमध्ये माता दुर्गेची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. तसेच माता दुर्गेची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहते. यंदा ३ ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीला सुरूवात होणार आणि १२ ऑक्टोबरला विजयादशमीला संपणार असून याच दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

यंदा अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवारी 4 ऑक्टोबरला रोजी पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी समाप्त होईल.

हिंदू पंचागानुसार घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत ते 8 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल.

कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी

3 ऑक्टोबर 2024 - घटस्थापना , शैलीपुत्र पूजा

4 ऑक्टोबर 2024 - ब्रम्हचारिणी पूजा

5 ऑक्टोबर 2024 - चंद्रघंटा पूजा

6 ऑक्टोबर 2024 - कुष्मांडा पूजा

7 ऑक्टोबर 2024 - स्कंदामाता पूजा

8 ऑक्टोबर 2024 - कात्यायनी पूजा

9 ऑक्टोबर 2024 - कालरात्री पूजा

10 ऑक्टोबर 2024 - सिद्धिदात्री पूजा

11 ऑक्टोबर 2024 - महागौरी पूजा

12 ऑक्टोबर 2024 -विजयादशमी पूजा

शारदीय नवरात्रीचे महत्व

हिंदू धर्मात नवरात्रीला खुप महत्व आहे. पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गी देवीने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी देवी दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपाची पूजा केली जाते. नवरात्रीत नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवी दुर्गा पृथ्वीवर येतात, त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गा पूजेला खास महत्व आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT