Navratri 2024 Sakal
लाइफस्टाइल

Navratri 2024: नवरात्रीत विड्याच्या पानांशी संबंधित करा 'हे' उपाय, आर्थिक संकट दूर होऊन भाग्य उजळेल

Navratri 2024: शारदीय नवरात्री फक्त एका दिवसावर येऊन ठेपली आहे. या दिवसांमध्ये विड्याच्या पानांशी संबंधित काही उपाय केल्यास भाग्य उजळू शकते. तसेच माता दुर्गा देखील प्रसन्न होते.

Puja Bonkile

Navratri 2024: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. शारदीय नवरात्री फक्त एका दिवसावर येऊन ठेपली आहे. यंदा शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरू होत असून 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच या दिवसांमध्ये विड्याच्या पानांशी संबंधित उपाय केल्यास अनेक संकटे दूर होतात.

हिंदू धर्मात विड्याच्या पानांना खास महत्व आहे. तसेच हे पानं शुभ मानले जातात. सर्व शुभ कार्यात या पानांचा वापर केला जातो. या विड्याच्या पानांचा उल्लेख पौराणिक कथा आणि धर्मग्रंथातही आला आहे. नवरात्रीमध्ये पानांशी संबंधित काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते. तसेच अनेक समस्या दूर होतात.

वाईट नजर टाळण्यासाठी

नवरात्रीत विड्याच्या पानांवर केशर ठेवा आणि माता दुर्गा स्तोत्र तसेच नावाचे पठण करावे. असे केल्याने घरात सुख - शांतीचे वातावरण निर्माण होते. नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो.

आर्थिक संकटावर दूर करण्यासाठी

नवरात्रीच्या नवव्या दिवशी विड्याच्या पानांवर गुलाबाचे फूल ठेऊन ते माता दुर्गाला अरप्ण करावे. नवमी पूजेनंतर ही पाने मदीत विसर्जित करावी. असे केल्याने सुख- समृद्धी प्राप्त होते आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच आयुष्यात संकटे दूर होतात. माता दुर्गेची कृपादृष्टी कायम राहते.

संतती सुखासाठी

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेला विड्याचे पान अर्पण करावे. नऊ लहान मुलींना जेवण देऊन भेटवस्तू द्यावी. असे केल्याने संततीचे सुख प्राप्त होते. वैवाहिक जीवन देखील आनंदी राहते.

यश आणि धनप्राप्तीसाठी

नवरात्री दरम्यान संध्याकाळी विड्याच्या पानांना दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे. आता ते माता दुर्गाला अर्पण करावे. झोपताना हे पान सोबत ठेवा आणि सकाळी उठल्यावर माँ दुर्गा मंदिराच्या मागे ठेवा. असे केल्याने यश मिळेल. संपत्ती आणि समृद्धी वाढते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT