लाइफस्टाइल

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती; तारीख, वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

जाणून घ्या! छत्रपती शिवाजी महाराज जयंती विषयी…

Aishwarya Musale

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. राज्य सरकारकडून १९ फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या वर्षी, सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा इतिहास

१८७० साली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. नंतर लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.

लोकमान्य टिळक त्या काळात जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटीविरुध्द लढा देत होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिकरित्या साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले. छत्रपती शिवाजी महाराजचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो, यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजची जयंती साजरी केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT