Shiv Jayanti 2024 esakal
लाइफस्टाइल

Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत दिले मोलाचे योगदान

महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. ही जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. ही जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज हा जयंती सोहळा तारखेप्रमाणे साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.

दरवर्षी मोठ्या आतुरतेने वाट पाहणारे शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांवर गर्दी करतात. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या किल्ल्यांच्या साथीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

स्वराज्यात आणलेला प्रत्येक किल्ला आज ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देतो. आज आपण शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रातील अशाच काही किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या किल्ल्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे योगदान दिले.

शिवनेरी किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. या किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाल्यामुळे या किल्ल्याला स्वराज्यामध्ये एक वेगळे स्थान प्राप्त झाले. या गडावर शिवाई देवीचे मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले होते, असे म्हटले जाते. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित आहे.

तोरणा किल्ला

शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला होय. हा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले होते. असे म्हटले जाते की, या किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना शिवाजी महाराजांना प्रचंड धन सापडले होते. या धनाचा उपयोग महाराजंनी स्वराज्याच्या बांधणीसाठी केला होता. तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात स्थित आहे.

पन्हाळा किल्ला

शिवाजी महाराजांच्या अनेक महत्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक असलेला हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे. इ.स.१६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. सिद्धी जोहरच्या अजस्त्र वेढ्यातून शिवाजी महाराज मोजक्या सहकाऱ्यांसोबत बाहेर पडले आणि विशाळगडावर सुखरूप पोहचले होते.

सिंहगड किल्ला

स्वराज्याचा झुंझार मावळा वीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत इ.स.१६७० मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला होता. हा किल्ला तर त्यांनी जिंकला परंतु, शत्रूसोबत दोन हात करताना त्यांनी प्राण गमावले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी तानाजीबद्दल, ‘गड आला, पण सिंह गेला’ असे उद्गार काढले होते.

सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव हे कोंढाणा होते. मात्र, या किल्ल्यासाठी तानाजी मालुसरे यांनी दिलेल्या बलिदानानंतर हा किल्ला ‘सिंहगड’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT