Sania-Shoaib Divorce  esakal
लाइफस्टाइल

Sania-Shoaib Divorce : शोएबने तलाक दिला नाही तर सानियानेच त्याला सोडलं, काय असते खुला पद्धत?

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक हा नुकताच पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाहबंधनात अडकला आहे. शोएबचे सनासोबतचे हे तिसरे लग्न आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Sania-Shoaib Divorce : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक हा नुकताच पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाहबंधनात अडकला आहे. शोएबचे सनासोबतचे हे तिसरे लग्न आहे. याआधी शोएबने भारताची आयशा सिद्दीकी आणि टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केले होते.

२०१० मध्ये सानियासोबत लग्न करण्यापूर्वी शोएबने आयशाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर, सानिया आणि शोएब पारंपारिक पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. मागील काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यामध्ये घटस्फोट झाला असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

आता या अफवांना पूर्णविराम मिळाला असून सानियाने शोएबला खुल्या पद्धतीने घटस्फोट दिला असल्याचे समोर आले आहे. शोएबच्या तिसऱ्या लग्नावर सानिया मिर्झाच्या वडिलांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सानियाने खुल्या पद्धतीने शोएबला घटस्फोट दिला आहे. मुस्लिम समाजातील घटस्फोट देण्याची ही खुला पद्धत काय आहे? त्याबदद्ल आपण जाणून घेऊयात.

खुला पद्धत काय आहे?

मुस्लिम समाजातील खुला पद्धत हा घटस्फोटाचा एक प्रकार आहे. या पद्धतीमध्ये मुस्लिम महिला स्वत:हून हा घटस्फोट घेऊ शकते. खुला पद्धतीद्वारे महिला आपल्या पतीशी संबंध तोडू शकते. तलाक या पद्धतीमध्ये पुरूष आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतो तर खुला या पद्धतीमध्ये महिला आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते.

खुला या पद्धतीचा उल्लेख कुराण आणि हदिसमध्ये करण्यात आलेला आहे. तथापी, जर एखाद्या महिलेने तिच्या पतीकडून खुला पद्धतीने घटस्फोट घेतला तर तिला तिच्या मालमत्तेचा काही हिस्सा परत करावा लागतो. मात्र, या खुल्यासाठी पती-पत्नी दोघांची परवानगी मिळणे आवश्यक असते. विशेष बाब म्हणजे खुलाची इच्छा फक्त महिलाच ठेवू शकते.

तलाकची पद्धत काय आहे?

इस्लामध्ये तलाक ही एक घटस्फोटाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये पती किंवा पत्नी एकमेकांना तलाक देऊ शकतात. या तलाकमध्ये विवाहाच्या अटींचे पालन करणारे जोडपे वेगळे होतात. मुस्लिम समाजातील शरियत कायद्यानुसार, त्या पती-पत्नीला किमान ६ महिने एकत्र रहावे लागते.

जर त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा समेट झाला नाही तर तलाकनंतर पती-पत्नी सोबत राहत नाहीत. जर पती-पत्नीला मुले असतील तर या मुलांच्या शिक्षणासाठी ठराविक पोटगी पती पत्नीला देतो. पती आणि पत्नी या दोघांच्या संमतीनुसार ही रक्कम ठरवली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT