Shravan 2023 eSakal
लाइफस्टाइल

Shravan 2023 : यंदाचा श्रावण आहे खास! काय करावं अन् काय करू नये? जाणून घ्या

यंदाचा श्रावणमास हा दोन महिन्यांचा असणार आहे.

Sudesh

हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकर महादेवाला समर्पित असतो. श्रावण सोमवारी महादेवाची विशेष पूजा केली जाते. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. यंदाचा श्रावणमास हा दोन महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे महादेवाला प्रसन्न करण्याची मोठी संधी भक्तांना मिळणार आहे. (Shravan 2023)

श्रावणात भगवान शंकराची कृपादृष्टी मिळवण्यासाठी कित्येक लोक उपवास करतात. काही लोक संपूर्ण श्रावणमासात उपवास करतात, तर काही केवळ श्रावण सोमवारी उपवास करतात. या काळामध्ये उपवास करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

महादेवांचा श्रावणमास

शास्त्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यात भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात. विष्णू योगनिद्रेत असल्यामुळे भगवान शिव हे विश्व चालवण्याची जबाबदारी स्वीकारतात. म्हणूनच, श्रावण हा महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो.

या गोष्टी आवर्जून करा

श्रावणात दररोज सकाळी उठून, अंघोळीनंतर देवघर स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. यानंतर देवघरात गंगाजल शिंपडावे. त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य याठिकाणी ठेवावं. यामध्ये पाणी, दूध, साखर, तूप, दही, मध, चंदन, फुलं, मिठाई (नैवेद्य) आणि बेलाच्या पानाचा समावेश असावा. पूजेची तयारी करताना शिव स्त्रोताचा जप करत रहावे.

या गोष्टी टाळा

श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्या व्यक्तीने या संपूर्ण काळात कांदा आणि लसूण खाऊ नये. श्रावण महिन्यात मांस, मासे आणि अंडी असे पदार्थ खाऊ नयेत. तसेच, श्रावण महिन्यात मद्यपान संपूर्णपणे टाळावे.

भगवान शंकराची पूजा करताना हळद आणि तुळशी या गोष्टींचा वापर टाळावा. श्रावणात तुम्ही सकाळी पकडलेला उपवास सायंकाळी सोडू शकता.

श्रावण सोमवार

यंदाचा श्रावणमास हा विशेष आहे. अधिकमासामुळे श्रावण दोन महिन्यांचा असणार आहे. जवळपास १९ वर्षांनी एवढ्या मोठ्या कालावधीसाठी म्हणजेच २ महिन्यांचा श्रावण महिना येण्याचा योग आला आहे. यावर्षी श्रावण महिना ४ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये असणार आहे. यंदाचा पहिला श्रावण सोमवार हा १० जुलै रोजी असणार आहे. तर शेवटचा श्रावण सोमवार हा २८ ऑगस्ट रोजी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT