Shravan Mahina esakal
लाइफस्टाइल

Shravan Mahina : महादेवांच्या भक्तांसाठी सुवर्ण योग; श्रावणी सोमवार करण्याची संधी आठवेळा मिळणार!

यंदा चार नाहीतर आठ आहेर श्रावण सोमवार?

Pooja Karande-Kadam

Shravan Mahina : श्रावण महिना म्हटला की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. देवीची पूजा, मंगळागौर, श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, श्रावण महिन्याची माहिती तशी तरी सगळ्यांनाच असते.

पण त्यातही मंगळागौर म्हटलं की मंगळागौर पूजा, मंगळागौरीची आरती ही सगळी मजा कशी डोळ्यासमोर येते. श्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे व्हायला लागतात आणि श्रावण महिना सुरू झाला की वर्ष पटापट संपायला सुरूवात होते अशी सर्वांचीच भावना असते.

धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपासनेसह उपवास करतात. यावेळी त्यांना पाण्यासोबत बेलपत्र, धतुरा, शमीची पाने इत्यादी अर्पण केले जातात. तसेच या महिन्यात अविवाहित स्त्रिया इच्छित वर मिळविण्यासाठी सोमवारी उपवास करतात.

श्रावण महिन्यातील सण आणि तारखा

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना असून या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असल्यामुळे या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो.

श्रावण महिन्यात प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या तरी देवतेची पूजा अथवा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे. या महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

श्रावण हा चतुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने या महिन्याला अधिक महत्त्व आहे. यंदा श्रावणात किती सोमवार आहेत याबद्दल माहिती घेऊयात.

श्रावण सोमवारच्या तारखा

यंदा एकूण सात श्रावणी सोमवार आले आहेत. 17 जुलैच्या आमावस्येला अधिक मासाची सुरूवात होणार आहे. त्यामूळे तो सोमवार गृहित धरला जात नाही. त्यापुढील येणाऱ्या सोमवारपासून सोमवारला सुरूवात होणार आहे. पण बऱ्यापैकी लोक अधिक मासातील श्रावण न पाळता पुढील येणाऱ्या नीज श्रावणाला खरा श्रावण मानतील.

यंदा 4 ऐवजी 7 श्रावण सोमवार असतील.

1. पहिला सोमवार: 24 जुलै

2. दुसरा सोमवार: 7 ऑगस्ट

3. तिसरा सोमवार: 14 ऑगस्ट

4. चौथा सोमवार: 21 ऑगस्ट

5. पाचवा सोमवार: 28 ऑगस्ट

6. सहावा सोमवार: 4 सप्टेंबर

7. सातवा सोमवार: 11 सप्टेंबर

श्रावण महिन्याचं माहत्म्य

हिंदू पौराणिक कथेनुसार, जे लोक सोमवारी भगवान शिव शंकरांची धार्मिक पूजा करतात, त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते. या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता. असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो.

श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे. हा महिना भगवान शंकरांना प्रिय असलेला महिना आहे. या महिन्यात जे भक्त शिवशंकरांची अंत:करणापासून पूजा करतात, त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात.

श्रावण या महिन्यात दान करण्याचे महत्त्व खूप जास्त आहे त्यासाठी प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत गरिबांना भोजन देण्याची पद्धत आहे.या महिन्यात कथा, ग्रंथ पारायण केले जातात.श्रावण महिन्यात घरोघरी पारायणं, ग्रंथ वाचन होत असतं.

त्यामुळे सत्यनारायण आणि पूजेचा प्रसाद घरोघरी असतो. त्यानिमित्ताने अन्नदानाचे पुण्य मिळते अशी लोकांची श्रद्धा असते. काही लोक तर दरवर्षी श्रावण कधी येणार याची वाट पाहत असतात. पण यावेळ दोन महिने श्रावणाचा योग असल्याने लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT