Shravan Somvar sakal
लाइफस्टाइल

Shravan Somvar 2023: आजच्या श्रावणी सोमवार निमित्त ही शिवामूठ करा अर्पण; जाणून घ्या

श्रावणी सोमवारी शंकराचे पूजन करून धान्याची मूठ म्हणजेच शिवमूठ शंकराच्या पिंडीवर वाहिली जाते.

Aishwarya Musale

स्कंद पुराणानुसार भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणजे श्रावण, सणांचा महिना अशी ओळख असणारा श्रावण हे एकाअर्थी उत्साहाचे, चैतन्यचे प्रतीक मानला जातो, पण यातही शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे महत्त्व असते.

श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा महादेवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावणातील सोमवारी शंकराच्या पूजेनंतर शिवामूठ वाहतात.

आजची शिवमुठ कोणती आहे ?

आज श्रावणातील दुसऱ्या श्रावणी सोमवारी आजच्या दिवशी भगवान महादेवाला तीळाची शिवमूठ अर्पण करावी.

शिवमूठ वाहताना म्हणायचा मंत्र

‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ असा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी, असे म्हटले जाते.

श्रावणी सोमवारी शिवपूजनासाठी भगवान शंकराच्या आवडत्या गोष्टी म्हणहेच बेलाचे पान, पंचामृत, धोत्रा, चंदन, अक्षता अर्पण केल्या जातात तर तूप व साखरेचा नैवैद्य दाखवला जातो. अनेक शिवभक्त हे एकवेळ भोजन करून श्रावणी सोमवारचा उपवास देखील करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Latest Marathi News Live Update: व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीसाठी शासनाची मंजुरी

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

SCROLL FOR NEXT