Shravan Vastu Tips  esakal
लाइफस्टाइल

Shravan Vastu Tips : श्रावणात करा फक्त एवढेच बदल, घरात होईल पैसा, सुख अन् समाधानाचा वर्षाव!

श्रावणात पूजा करताना शिवलिंग कोणत्या दिशेला ठेवावे?

Pooja Karande-Kadam

Shravan Vastu Tips : आयुष्य समस्यांनी ग्रासलेले आहे आणि दररोज आपल्याला पैसे, आरोग्य, करिअर, व्यवसाय, शिक्षण, लग्न, नातेसंबंध इत्यादी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ह्या सर्व प्रकारामुळे तणाव आणि चिंता वाढते. आयुष्यात समस्या नाही असे नाही परंतु यासाठी उपाय देखील आहेत.

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वापरून तुम्ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता.

घरात आणि आपल्या ऑफिसमध्ये अथवा आपल्या आजूबाजूला सुख आणि समृद्धी हवी असेल तर त्यासाठी वास्तूचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या सगळ्या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन वातावरण अधिक सकारात्मक बनवण्यास मदत मिळते. (Shravan Vastu Tips : Do these measures of Vastu in the month of Sawan Bholenath's blessings will shower)

वास्तू नियमांप्रमाणे पूर्व आणि उत्तर ही दिशा अधिक उर्जात्मक आहे. त्यामुळे या दिशांना योग्य गोष्टी ठेवल्यास, आरोग्य, समृद्धी आणि इतर शक्तींचा विकास होतो.

या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये श्रावण महिना आणखी खास असणार आहे. कारण 19 वर्षांनंतर श्रावण आणि अधिक महिना एकत्र येत आहेत. म्हणजे देवांचे देव महादेव आणि जगाचा रक्षक भगवान विष्णू यांचा आशीर्वाद एकत्रितपणे आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे या महिन्याचे महत्त्व अधिकच वाढते.

या महिन्यात घरात काही बदल केले तर ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. श्रावणात महादेवांची उपासना केली जाते. त्यावेळी शिवलिंग कुठे ठेवावं, श्रावणात घराच्या दरवाजावर गोमुत्र शिंपडणे घरात सकारात्मक उर्जा देणारं ठरणार आहे. (Vastu Tips)

शिवलिंग या दिशेला ठेवा

जर तुम्ही घरी शिवलिंग बसवण्याचा विचार करत असाल तर यासाठी श्रावण महिना उत्तम आहे. पण शिवलिंगाच्या दिशेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. शिवलिंग घराच्या ईशान्य कोपर्‍यात म्हणजेच उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवणे नेहमीच शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. ही दिशा देवी-देवतांची दिशा मानली जाते.

हे काम अवश्य करावे

काम सावन महिन्यात संपूर्ण घराची रोज स्वच्छता करावी. कारण घरात घाण राहिल्याने सदस्यांच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो. शिवलिंगाजवळ रुद्राक्ष ठेवा आणि त्याची विधिवत पूजा करा. पूजा झाल्यानंतर रुद्राक्ष लाल कपड्यात बांधून कपाटात ठेवा. वास्तूच्या या उपायाने घरात धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही. (Rudraksha)

मुख्य दारवाजावर हा उपाय करा

श्रावणात घराच्या मुख्य दारावर रोज गंगाजल शिंपडा. मुख्य दरवाजाच्या चौकटीवर स्वस्तिक चिन्ह बनवा. यानंतर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा. यानंतर शिवालयात जाऊन भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात.

तुळशीची झाड

तुळशीच्या झाडाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अशा वेळी श्रावण महिन्यात तुळशीचे रोप घरामध्ये लावावे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या उत्तर-पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावून त्याची रोज पूजा केल्याने सौभाग्य वाढते. (Tulasi)

घरात या गोष्टी आणा

तुम्ही तुमच्या घर अथवा ऑफिस अथवा तुमच्या शो रूममध्येही पूर्व दिशेला लाकडी फर्निचर अथवा लाकडाने बनवलेल्या कोणत्याही वस्तू ठेवाव्यात. उदाहरणार्थ सामान ठेवण्यासाठी वॉर्डरोब, शो पीस, लाकडी फ्रेममधील फोटोज यांची निवड करावी.

यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा घरामध्ये मिळते असं म्हटलं जातं. लाकडी वस्तू या घराला शोभाही देतात आणि बघायलाही प्रसन्न वाटतं त्यामुळे या गोष्टींचा उपयोग करावा. (Shravan 2023)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT