Friday Upay Sakal
लाइफस्टाइल

शुक्रवारी 'या' गोष्टी करू नका, माता लक्ष्मी होईल नाराज

शक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी महिलांना काही लक्षात ठेवल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते.

Puja Bonkile

शक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो. धनाची देवी माता लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. या दिवशी महिलांनी काही गोष्टींची काळजी घेतल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते.

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महिलांनी पुढील कामे करावे

सकाळी उठावे

माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी घरातील महिलांनी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. ज्या घरात लोक सूर्योदयानंतर उठतात, अशा लोकांवर माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहत नाही.

दुपारी झोपू नका

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महिलांनी दुपारी झोपणे टाळावे. माता लक्ष्मीजींना हे काम आवडत नाही. म्हणूनच महिलांनी दुपारी झोपण्याची सवय सोडली पाहिजे.

अन्न वाया घालू नका

घरातील अन्नधान्याची नासाडी होणार नाही याची काळजी महिलांनी घ्यावी. ज्या घरात अन्नधान्याची नासाडी होते त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही आणि लवकरच दारिद्र्य येऊ शकते.

स्वच्छता

सर्वात आधी घर स्वच्छ ठेवा. माता लक्ष्मी नेहमी स्वच्छ घरामध्ये वास करते. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराची स्वच्छता आवश्यक आहे.

मंदिरात दिवा लावावा

महिलांनी विशेष काळजी घ्यावी की त्यांनी संध्याकाळी मंदिरात दिवा लावावा. संध्याकाळी माता लक्ष्मीजींची आरती केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि कृपादृष्टी कायम ठेवतात.

भांडी घासू नका

महिलांनी संध्याकाळी स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेऊ नये. रात्रभर स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी ठेवली तर माता लक्ष्मीजी नाराज होऊ शकतात.

झाडूला लाथ मारू नका

झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. महिला असो वा पुरुष, कोणीही झाडूला लाथ मारू नये. जर त्यांनी हे काम केले तर त्यांच्या घरात गरिबी येते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT