shweta inamdar business
shweta inamdar business sakal
लाइफस्टाइल

उद्यमशीलतेचे रेशमी ‘धागे’

प्रशांत पाटील, सकाळ वृत्तसेवा

- श्‍वेता इनामदार, उद्योजक

माझ्या वडिलांचे स्वप्न मी आयएएस व्हावे, असे होते. त्यांचे ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही. मात्र, उद्यमशीलतेचा वसा घेऊन एक मुलगी म्हणून त्यांचा वारसा कायम ठेवला. पुण्याचे एस. ए. इनामदार अर्थात सुभाष अनंत इनामदार माझे वडील. त्यांनी १९७९ मध्ये पुण्यात रेडिमेड ब्लाऊजचे दुकान सुरू केले. त्यांच्या पुण्यामधील शनिवार पेठेतील दुकानाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद असायचा.

मीही आठवीमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वडिलांच्या दुकानावर जात असे आणि त्यांना थोडीफार मदत करत असे. मला या व्यवसायामध्ये फार गोडी नव्हती. माझे लहानपणापासून स्वप्न होते आयएएस होण्याचे. वडिलांचीही तीच इच्छा होती. त्या दृष्टीने मी अभ्यास आणि मेहनतदेखील करत होते. मात्र, नियतीने वेगळेच लिहून ठेवले होते. वडिलांचे अचानक निधन झाले.

निधनाच्या दुसऱ्याच दिवशी माझी दिल्ली येथे परीक्षा होती. मला तिकडे जावे लागले. परत आल्यानंतर घरातील परिस्थिती पाहता आईला दुःखातून सावरायचे होते, बहीण लहान असल्याने तिची काळजी घ्यायची होती आणि मोठा भाऊ गतिमंद असल्याने ज्येष्ठ कन्या म्हणून परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी पार पाडायची होती.

परीक्षा उत्तीर्ण होऊनही मला पुण्यातच राहावे लागले आणि वडिलांच्या उद्योगामुळे घेण्यात आलेले कर्ज; तसेच आर्थिक स्थिरतेसाठी मेहनत घ्यावी लागली. लग्नाचे वय झाल्यावर नातेवाइकांनी एक स्थळ पाहिले आणि आईने होकारदेखील कळवला; पण माझ्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव मी माझ्या होणाऱ्या पतीला दिली होती. त्यांनी त्याला होकार दिला होता.

लग्नानंतर माझ्या आयएएस होण्याच्या स्वप्नांना जणू पूर्णविरामच लागला. लग्न झाल्यानंतर मी ठाण्याला राहायला गेले. सासर तिकडचे असल्याने मला पुण्यातील दुकान सांभाळण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. रोजचा ठाणे-पुणे हा प्रवास सुरू झाला होता. पतीने सुचवले, की तू ठाण्यातच का नाही काही प्रयत्न करत? मी बाजार अभ्यास सुरू केला. रेडीमेड ब्लाऊज ठाण्यामध्ये नाहीत असे समजल्याने मी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. अशा परिस्थितीत मी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले.

मी माझे सोने विकले आणि स्वतःचेच दुकान घेतले आणि सुरू केला उद्योजिका होण्याचा प्रवास. रेडिमेड ब्लाऊज या संकल्पनेला मी माझा व्यवसाय बनवला आणि त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. मला सुरुवातीला शिवणकाम येत नव्हते. मात्र, नंतर मी हे सर्व शिकून घेतले. आता वाटते माझ्या रक्तातच ‘उद्योग’ आहे. आणखीन एका नव्या शोरूमच्या नव्या संकल्पनेसह आम्ही ऑनलाइन शोरूम सुरू करणार आहोत.

पुणे-मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये माझा यशाचा प्रवास सुरू होताच. दरम्यान सातासमुद्रापार जाण्याची संधी मिळाली. दुबईमध्ये २०१९ मध्ये ब्रॅंडचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. हळूहळू मी दुबईनंतर अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियापर्यंत जाऊन पोचले.

‘चूल आणि मूल’ सांभाळणाऱ्या महिलांची जबाबदारी

उद्योग सुरू केल्यानंतर आपण एकटेच काही करू शकत नाही. त्यामध्ये हातभार असतो तो मला मदत करणाऱ्या ‘गृहिणी कारागिरां’चा. ‘गृहिणी कारागीर’ ही माझी ‘टीम’ आहे. या कारागीर त्यांचे घर सांभाळतात आणि आमच्या उद्योगाचीदेखील जबाबदारी घेतात. सध्या माझ्याबरोबर पन्नास महिला काम करत आहेत. त्यांचे ‘हातावरचे पोट’ असल्याने त्यांचीही माझ्यावर जबाबदारी आहे. त्यांनी एक उद्योजिका म्हणून काम करावे यासाठी मी नेहमीच त्यांना ऑनलाइन मार्केटिंग व्यवसायाचे धडे देते. मी नसताना त्यांना हे जमायला हवे यासाठी त्यांना मी संपूर्ण प्रशिक्षण देते.

विविध क्षेत्रांतील महिलांकडून मागणी

‘एस. ए. इनामदार’ हा ब्लाऊज ब्रँड सुरू केल्यानंतर सर्वसामान्य महिलांमधून मागणी वाढू लागली. कारण त्यांची किंमत प्रत्येक महिलेला परवडणारी होती. नंतर चित्रपट आणि मालिकांमधील कॉस्च्यूम डिझायनरकडूनही रेडीमेड ब्लाऊजना मागणी वाढू लागली. आता सेलिब्रिटींबरोबरच नामवंत वकील, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी ते अगदी सर्वसामान्य महिलांमध्येही मी तयार केलेल्या ब्लाऊजना पसंती मिळत असल्याने आनंद होतो.

महिलांना संदेश

प्रत्येक स्त्री ही ‘वेल प्लॅनर’ असते. माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितले होते, ‘low aim, is crime. स्वप्ने आणि ध्येये मोठी ठेव.’ ती साध्य करण्यासाठी मेहनत करावी लागते. मात्र, त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतरचा आनंद गगनात न मावणारा असतो. त्यामुळे महिलांनी व्यवसाय करताना प्रॅक्टिकल राहावे. व्यवसायाकडे पार्ट टाइम म्हणून न पाहता फुल टाइम काम केले तर यशही तसेच मिळेल.

(शब्दांकन - सुचिता गायकवाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT