Lifestyle Tight Bra Side Effects  esakal
लाइफस्टाइल

Tight Bra Side Effects : तुम्हीही फिट्ट ब्रा वापरताय? थांबा करावा लागेल गंभीर आजाराचा सामना

महिलांच्यात नेहमी चर्तेत असणारा विषय म्हणजे ब्रा

सकाळ डिजिटल टीम

Side Effect Wearing Tight Bra : महिलांच्यात नेहमी चर्तेत असणारा विषय म्हणजे ब्रा किंवा ब्रेसिअर हा होय. साडी किंवा ड्रेस यात अधिक कम्फरटेबल वावरायचे असेल तर ब्रा शिवाय दुसरा पर्याय नाही. कोणताही सण असो किंवा कोणताही प्रसंग, महिला त्यांच्या फॅशनची काळजी घेतात.

काय मॅचिंग घालायचे यासोबतच त्या फिगरची खूप काळजी घेतो. सुडौल बांधा दिसावा म्हणून टाईट परकरही बाजारात आहेत. छातीचा आकार योग्य दिसावा यासाठी ब्रा योग्य निवडणे गरजेचे आहे. स्वतःला अधिक तंदुरुस्त आणि आकर्षक दिसण्यासाठी, स्त्रिया घट्ट आणि लहान कपच्या ब्रा खरेदी करतात.

लहान साइजच्या ब्रा वापरणे वरवर जाणवत नसले तरी अधिक त्रायदायक असते. ज्याने अनेक आजारही होऊ शकतात. फिट ब्रा वापरल्याने स्त्रीयांना केवळ अस्वस्थच वाटत नाही. तर आरोग्याच्या अनेक समस्या सुरू होतात. घट्ट ब्रा घालणाऱ्या महिलांवर अनेक नकारात्मक परिणाम होतात. यामुळे घट्ट ब्रा वापरण्याचे धोके कोणते आहेत हे पाहूयात.

खाज, जळजळ होणे

स्तनाच्या आरोग्य आणि योग्य शेपसाठी ब्रा घालणे आवश्यक आहे. याने फिगर सुंदर आणि शेपमध्ये दिसतं. पण, अधिक फिट्ट ब्रा घातल्याने घाम येतो. त्यामुळे शरीरात पुरळ उठतात. खाज सुटू लागते. एवढेच नाही तर स्थनांच्या त्वचेवर संसर्ग होण्याचा धोकाही असतो.

अ‍ॅसिडिटी होते

जेव्हा तुम्ही घट्ट ब्रा घालता तेव्हा ती फक्त त्वचेसाठीच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवरही परिणाम करते. ब्राचा खालचा पट्टा अनेकदा फुफ्फुसाच्या खालच्या भागापर्यंत पोहोचतो. जिथे नेहमी दाब पडतो. त्याचा पोटावरही दाब पडतो. यामुळे पोटात तयार होणारे आम्ल वरच्या दिशेने रिफ्लेक्स होते. अशा स्थितीत तुम्हाला अॅसिडिटी, छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे अशा समस्या सुरू होऊ शकतात.

स्तनांमध्ये वेदना

फिटिंग आणि लहान आकाराची ब्रा घातल्यास स्तनाच्या समस्येचाही सामना करावा लागतो. तुमच्या स्तनांमध्ये वेदना जाणवू शकतात. ही समस्या अशा लोकांना जास्त असू शकते ज्यांचे स्तन मोठ्या आकाराचे असतात.

पाठदुखी होते

अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या महिलांचे स्तन मोठे आहेत आणि आकार आणि आकृती टिकवून ठेवण्यासाठी त्या जबरदस्तीने लहान आकाराची ब्रा घालतात. त्यांना पाठदुखीचा त्रास होतो. पाठदुखी सारख्या समस्या असतात.

रक्ताभिसरण क्रिया मंदावते

जास्त घट्ट ब्रा घातल्याने रक्ताभिसरणावरही परिणाम होऊ शकतो. अनेक वेळा खूप घट्ट ब्रामुळे स्तनाच्या नसांना इजा होण्याचा धोका असतो.

आकारावर परिणाम

तुमच्या स्तनांना आधार देण्यासाठी आणि योग्य आकारात ठेवण्यासाठी ब्रा मदत करते. परंतू चुकीच्या साइजची ब्रा घालून स्तनांचा आकार बिघडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT