Relationship Tips 
लाइफस्टाइल

Relationship Tips : दीर्घकाळ SEX न करण्याचे काय आहेत दुष्परिणाम, 'या' समस्यांचा करावा लागेल सामना

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips : लैंगिक संबंध केवळ शारीरिकदृष्ट्या नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचे आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. दरम्यान एका अहवालानुसार दोन व्यक्तींनी दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर त्यांच्या शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या एका अभ्यासात हे सांगण्यात आले आहे. दीर्घकाळ शारीरिक संबंध न ठेवल्याने शरीरावर काय परिणाम होतात यावर संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन म्हणजे NCBI च्या मते एका संशोधनात १७ हजार ७४४ लोकांनी भाग घेतला होता. यामध्ये १५.२ टक्के पुरुष तर २६.७ टक्के महिला होत्या ज्यांनी एक वर्ष शारीरीक सबंध ठेवले नाहीत. तर ८.७ टक्के पुरुष तर १७.५ टक्के महिलांनी ५ वर्ष सेक्स केला नाही. यामुळे यांच्या शरीरावर प्रभाव पडला. 

जे जोडीदार शारीरिक सबंध ठेवतात. ते निरोगी देखील असतात, त्यांचा मानसिक ताणही कमी असतो. तसे या लोकांचा मेंदू सक्रिय असतो. मात्र जे लोक दिर्घकाळ सबंधं ठेवत नाहीत त्यांना मानसिक ताणाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. 

सेक्स न केल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. जेव्हा तुमचा मानसिक ताण वाढतो तेव्हा त्याचा रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि रक्तदाबही अनियमित होतो, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. 

जे लोक नियमित सेक्स करत नाहीत त्यांची स्मरणशक्ती कमी होऊ शकते, असे अभ्यासात समोर आले आहे. तसेच काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक लैंगिक संबंध ठेवतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. खरं तर, सेक्स तुमच्या मेंदूला न्यूरॉन्स वाढण्यास मदत करू शकते. 

सरासरी महिण्यात २१ वेळा सेक्स करणाऱ्या जोडप्यांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण देखील कमी असते. ३० हजार पुरुषांवर झालेल्या अभ्यासानुसार ज्यांनी महिन्यातून सरासरी २१ पेक्षा जास्त वेळा सेक्स केला त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता कमी होती. तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. मात्र जे करत नाहीत त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. 

एका अभ्यासानुसार, ज्यांनी आठवड्यातून एक ते दोन वेळा संभोग केला. त्यांच्या शरीरात विशिष्ट अँटीबॉडी ( Immunoglobulin A  ) ची उच्च पातळी दिसते. जी प्रतिकारशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

(ही माहिती आम्ही सामान्य ज्ञानाच्या आधारावर दिली आहे, याबाबत आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT