Signs Of PCOS esakal
लाइफस्टाइल

Signs Of PCOS : मैत्रिणींनो, तुम्हाला सतत भूक लागतीय, PCOS तर नाहीय ना!

पासीओएस हा वयाच्या १२ पासून ते ३५ पर्यंत असू शकतो

Pooja Karande-Kadam

Signs Of PCOS : जेव्हा पीसीओएसची समस्या उद्भवते तेव्हा शरीरात एंड्रोजन हार्मोन्स वाढतात. ज्यामुळे ही लक्षणे दिसू लागतात. जे आपल्या शरीरासाठी रेड अलर्टसारखे आहे.  PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक अंडाशय सिंड्रोम हा एक प्रकारचा संप्रेरक रोग आहे.

ज्यामध्ये अंडाशयात अंडी व्यवस्थित सोडली जात नाहीत. तसेच अनियमित मासिक पाळी आणि इतर अनेक समस्या उद्भवू लागतात. बऱ्याच वेळा पीसीओएसच्या समस्येमुळे मासिक पाळीवर परिणाम होत नाही आणि ते नियमित राहतात.

परंतु ही सर्व लक्षणे शरीरातील संप्रेरकांचा स्राव योग्य प्रकारे होत नसल्याचे दर्शवतात. या 6 लक्षणांसह समजून घ्या की शरीरात हार्मोन्सचा अडथळा आहे. ज्यामुळे पीसीओएस झाला आहे.

प्रत्येक महिलेला दर महिन्याला मासिक पाळीदरम्यान होणारी वेदना ही नकोशी असते. परंतु, तरीही मासिक पाळी चुकली तर त्या चिंताग्रस्त होतात, हे स्वाभाविक आहे. सध्याची तणावग्रस्त जीवनशैली, आहाराच्या अनिश्चित वेळा, धावपळ आणि लठ्ठपणा यामुळेही पीसीओएसची समस्या उद्भवू शकते.

जेव्हा पीसीओएसची समस्या उद्भवते तेव्हा हार्मोन्स योग्यप्रकारे तयार होत नाहीत. ज्यामुळे जेवल्यानंतरही तुम्हाला लवकर भूक लागते. आणि आपल्या जेवणाची वारंवारता वाढते. ज्यामुळे पीसीओएसमध्ये शरीराचे वजन वेगाने वाढते.

याच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर त्यात स्त्रियांमध्ये लठ्ठपणा, वयानंतरही चेहऱ्यावर पुरळ येणे, अमेनोरिया किंवा मासिक पाळी येणे, अनेक ठिकाणी केसांची वाढ, वंध्यत्व, याशिवाय महिलांना अनेकदा पोट फुगण्याची तक्रार असते. तथापि, यापैकी अनेक लक्षणे इतर रोगांशी देखील संबंधित असू शकतात.

पासीओएस हा वयाच्या १२ पासून ते ३५ पर्यंत असू शकतो. जसं सांगितल्याप्रमाणे हा कुठल्या वयात येतो. त्याप्रमाणे त्यावर उपाययोजना आहे. पासीओएसचे उपाय वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक स्त्रीच्या लक्षणाप्रमाणे हा उपाय ठरवला जातो.


उदा. समजा स्त्रीला पीसीओएस असेल आणि मूल होत नसेल तर उपाय वेगळा असू शकतो. किंवा तरुण मुलगी आहे तिला पीसीओएस आहे. तिची लक्षणं फक्त पाळीची अनियमितता किंवा लठ्ठपणा असेल तर उपाय वेगळा असतो.

सतत भूक लागणे

रात्री जेवण केल्यानंतर सकाळी लवकर भूक लागणे साहजिक आहे. म्हणूनच सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट करण्याचा नियम सांगितला आहे. पण जर तुम्हाला सकाळी भूक लागली नाही तर हे हार्मोनल गडबडीचे लक्षण आहे. ज्यामुळे पीसीओएसचा धोका असतो.

मूड स्वींग

मूड बदलणे, चिडचिड होणे आणि रडणे, म्हणजेच मूड बदलत असेल तर हे हार्मोनल डिस्टर्बचे लक्षण आहे. त्यामुळे PCOS चा धोका असतो. केस गळणे: केस गळणे खूप जास्त होत असेल आणि सर्व प्रयत्न करूनही थांबत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला PCOS ची समस्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father Kills Son : सांगलीत मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने घातला दगड; सततच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य, कासेगाव पोलिसांत गुन्‍हा

Hingoli News: तहानलेल्या वानरांसाठी पाण्याची सोय; हयातनगर येथील शेतकरी विजय पाटील यांचा पुढाकार

Beed News: पोस्ट ऑफिस आहे की जनरल स्टोअर?; पत्रे दुकानात अन् कर्मचारी सुस्त; नागरिक संतप्त, सेवेेचा लाभ मिळणार तरी कसा?

Beed News: ‘सीतेच्या न्हाणी’चे वैभव पडले अडगळीत; विकासाचा वनवास; किल्ले धारूरच्या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था वाढली

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT