akola love 
लाइफस्टाइल

कधी मित्राच्या एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडलात का?

एकीकडे मैत्री अन् दुसरीकडे प्रेम, तुम्हीही या कचाट्यात सापडलात?

शर्वरी जोशी

मैत्री किंवा प्रेम? असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही कोणाला निवडाल? कदाचित या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे नसेल. कारण, प्रेम जितकं गरजेचं आहे. तितकीच मैत्रीसुद्धा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देणं तसं कठीणचं. पण अनेक ठिकाणी मैत्री आणि प्रेम एकत्रितपणे सुंदररित्या नांदतांना दिसतं. थोडक्यात काय तर आपल्या मित्राच्या किंवा मौत्रिणीच्या गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडसोबतही आपली चांगली मैत्री होते. पण, कधी या मित्राचा किंवा मैत्रिणीचा ब्रेकअप झाला आणि त्यांच्याच एक्सच्या प्रेमात तुम्ही पडलात तर? काय? अनेक जण म्हणतील हा काय विचित्र प्रश्न. पण, हो असं होऊ शकतं. किंवा, काहींच्या आयुष्यात हे झालंदेखील असेल. आपल्या मित्राचा/ मैत्रिणीचा ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्याच एक्सच्या प्रेमात पडल्याची अनेक प्रकरण आहेत. परंतु, असं काही झालं तर संबंधित व्यक्तीची चांगलीच पंचाईत होते. कारण, एकीकडे मित्र आणि दुसरीकडे प्रेम. या दोन्हीच्या कचाट्यात आपण सापडतो. मग अशावेळी नेमकं काय करायचं ते जाणून घेऊयात. (signs-you-are-in-a-new-relationship)

१. धर्मसंकटातून असा काढा मार्ग -

कायम तुमच्या मनाचं ऐका आणि मनातील भावना लपवण्याचा जराही प्रयत्न करु नका. जर तुम्ही मित्राच्या एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडला असाल तर बिंधास्त प्रेम करा. यात काहीच चुकीचं नाही. आता त्या दोन्ही व्यक्ती स्वतंत्र आहेत. आणि, तेदेखील पुन्हा नव्याने कोणाच्याही प्रेमात पडू शकतात. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रेमात नक्कीच पडू शकता. यात काहीच चूक नाही. पण, या प्रेमात पडण्यापूर्वी मैत्रीत फूड पडणार नाही याची नक्कीच काळजी घ्या.

२. प्रेम की आकर्षण -

अनेकदा मित्राचा ब्रेकअप झाल्यानंतर तो किंवा त्याची एक्स गर्लफ्रेंड दु:खी झाले असतात. त्यामुळे त्या दोघांनाही भावनिक आधाराची गरज असते. अशातच जर मित्राची एक्स तुमचीही चांगली मैत्रीण असेल तर सहाजिकच ती तुमच्यात भावनिक आधार शोधण्याचा प्रयत्न करेल. तुम्हीदेखील तो आधार द्याल. पण, अनेकदा भावनिक आधार देणारेच प्रेमात पडत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे यात बऱ्याचदा प्रेम कमी आणि आकर्षण जास्त असतं. त्यामुळे आकर्षण आणि प्रेम यांच्यातील अंतर ओळखा. प्रेमात पडलात तर नक्कीच हे नातं पुढे नेण्याचा प्रयत्न करा. पण आकर्षण असेल तर वेळीच स्वत: ला सावरा.

triple love story

३. मित्राला याविषयी नक्की सांगा -

जर तुम्ही मित्राच्या एक्सच्या प्रेमात असाल किंवा तिला डेट करत असाल तर संबंधित मित्राला अंधारात न ठेवता सत्य सांगितलं पाहिजे. कारण, जर त्याला ही गोष्ट तिसऱ्या व्यक्तीकडून समजली तर तो हर्ट होऊ शकतो. किंवा, तुम्ही विश्वासघात केला असा त्याचा समज होऊ शकतो. त्यामुळे न घाबरता त्याला सत्य सांगा. नाही तर, प्रेम मिळवण्याच्या नादात मैत्री गमावून बसाल.

४. प्रेमात आव्हान तर येणारच -

काही दिवसांपूर्वी आपल्या डोळ्यासमोर दुसऱ्याला डेट करणारी मुलगी आज आपल्यासोबत आहे ही फिलिंग थोडी वेगळी असते. कदाचित प्रत्येक वेळी बोलताना तुम्हाला किंवा तिला अवघडल्यासारखं होईल. अनेकदा तुमच्यात वादही होती. ज्यामुळे संबंधित व्यक्ती जुन्या आणि नव्या नात्याची तुलना करु शकते. पण अशामध्ये न रागावता किंवा चिडता शांतपणे परिस्थिती हँण्डल करा.

५. लोकांकडे लक्ष देऊ नका -

अनेकदा अशा प्रकरणांमध्ये लोक ट्रोल करण्यास सुरुवात करतात. किंवा, व्यक्तीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करतात. मात्र, लोकांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात करा. कारण, या गोष्टींकडे लक्ष दिलं तर त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेसोबतच रिलेशनवरही होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT