Love esakal
लाइफस्टाइल

friendship day: ..तर समजा तुम्ही बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडलात

...और प्यार हो गया! तुमच्यात 'हे' बदल झालेत मग तुम्ही प्रेमात पडलात

शर्वरी जोशी

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, पावलावर आपल्याला असंख्य मित्र-मैत्रिणी, मार्गदर्शक भेटत असतात. मात्र, या सगळ्यांच्या गराड्यात असे काही व्यक्ती असतात जे तुमच्यासाठी अगदी खास असतात. म्हणजे, ज्यांच्याशी आपण कोणत्याही विषयावर कधीही आणि काहीही बोलू शकतो.

अगदी न घाबरता, लाजता किंवा कसलीही भीडभाड न ठेवता ज्यांच्या समोर आपण व्यक्त होतो ती व्यक्ती म्हणजे बेस्टफ्रेंड. आज त्याच बेस्टफ्रेंडचा किंवा तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या मित्र-मैत्रिणींचा दिवस. आज फ्रेंडशीप डे.

आज सगळे जण आपल्या प्रिय मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भेटून एकमेकांना शुभेच्छा देत असतील. पण, तुम्ही कधी तुमच्याच बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडलात का? किंवा असा विचार तरी तुम्ही केला आहे का?, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं तर? हो. असं अनेकांच्या बाबतीत घडलं आहे.

अनेक जण आधी एकमेकांचे चांगले मित्र, बेस्टफ्रेंड होते आणि नंतर त्यांचं प्रेम जुळलं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु, आपण आपल्या बेस्ट फ्रेंडच्याच प्रेमात पडलोय हे कसं काय ओळखायचं? चला तर मग जाणून घेऊयात. बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडल्याचे काही संकेत. (friendship-day-2021-signs-you-are-in-love-with-your-best-friend)

१. राग येणं -

जसे तुम्हाला बेस्टफ्रेंड व्यतिरिक्तही इतर मित्र-मैत्रिणी असतात. तसेच तुमच्या बेस्टफ्रेंडचेही असतील. मात्र, जर तुमचा बेस्टफ्रेंड तुमच्यासमोर इतर कोणाशी तरी बोलत असेल किंवा त्यांचा बॉयफ्रेंड/ गर्लफ्रेंड असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा राग येऊ शकतो.

जर तुमचा बेस्टफ्रेंड इतर कोणाचं तरी तुमच्यासमोर कौतुक करत असेल तर तुम्ही स्वत: ला इनसिक्युअर फिल करु लागतात आणि संबंधित व्यक्तीचा तुम्हाला राग येऊ लागतो. जर तुमच्या व्यतिरिक्त बेस्टफ्रेंडच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती असेल आणि तिचा तुम्हाला राग येत असेल तर समजून जा तुम्ही बेस्टफ्रेंडच्याच प्रेमात पडताय.

२. प्रायोरिटी होण्याचा प्रयत्न करणे -

जर तुम्ही बेस्टफ्रेंडच्या प्रेमात पडला असाल तर सतत त्यांचं अटेंशन मिळवण्याचा प्रयत्न करु लागता. त्यांची फर्स्ट प्रायोरिटी तुम्हीच असावं असं तुम्हाला सतत वाटू लागतं. आणि, त्यातूनच मग बेस्टफ्रेंडचं लक्ष सतत आपल्याकडे कसं जाईल यासाठी तुमचे प्रयत्न सुरु होतात.

३. त्यांच्या सहवासात राहणे -

प्रेमात पडल्यानंतर तुम्हाला बेस्टफ्रेंडचा सहवास सतत हवाहवासा वाटू लागतो. त्यामुळे पूर्वी बेस्टफ्रेंडने कधीही फिरण्याचा किंवा शॉपिंगचा प्लॅन केल्यावर टांग देणारे तुम्ही यावेळी मात्र, त्यांच्यासोबत कुठेही फिरायला जाण्यासाठी तयार असता. जर तुम्हाला सतत त्यांच्यासोबत रहावंसं वाटत असेल तर समजा तुम्ही प्रेमात पडलात.

४. मैत्रीपेक्षा थोडं जास्त -

मैत्री आणि प्रेम यांच्या कचाट्यात सापडल्यानंतर खरी पंचाईत होते. जे चाललंय त्याला प्रेम म्हणावं की मैत्री यामध्ये तुम्ही कन्फ्युज होता. कारण, मैत्रीपेक्षा अधिक आणि प्रेमापेक्षा कमी, अशी काहीशी तुमची अवस्था होते. पण अशावेळी शांतपणे सगळ्या परिस्थितीचा विचार करा आणि तुमच्या मनात नेमकं काय आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा.

५. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असणं -

जेव्हा तुम्ही बेस्टफ्रेंडच्या प्रेमात पडता त्यावेळी त्यांच्या प्रत्येक लहानसहान गोष्टींकडे तुमचं लक्ष असतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करु लागता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

Maharashtra Politics : ऑपरेशन ‘बुडवा’; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्या वळणावर उभा

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT