Silk Saree Fashion esakal
लाइफस्टाइल

Silk Saree Fashion : मॉर्डन आणि एलिगंट लूक हवाय? मग, 'या' पद्धतीने स्टाईल करा सिल्क साडी

Silk Saree Fashion : साडीतील फॅशन ही एव्हरग्रीन मानली जाते. कारण, साडी तुम्ही कोणत्याही पद्धतीने स्टाईल करा, त्यात तुम्ही सुंदर दिसणार, यात काही शंका नाही.

Monika Lonkar –Kumbhar

Silk Saree Fashion : साडीतील फॅशन ही एव्हरग्रीन मानली जाते. कारण, साडी तुम्ही कोणत्याही पद्धतीने स्टाईल करा, त्यात तुम्ही सुंदर दिसणार, यात काही शंका नाही. आजकाल अनेक महिला मॉर्डन किंवा पारंपारिक पद्धतीने साडी नेसतात. मार्केटमध्ये विविध प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत.

पार्टीवेअर, पारंपारिक, सिक्विन्स, शिफॉन, सिल्क, पैठणी इत्यादी अनेक साड्यांचे प्रकार महिलांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. या सगळ्यात खास करून महिलावर्गाची सिल्क साड्यांच्या डिझाईन्सला खूप पसंती मिळताना दिसत आहे.

साडीवर स्टायलिश लूक मिळवण्यासाठी अनेक महिला अभिनेत्रींच्या साडी लूक्सपासून प्रेरणा घेताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला साडीतील मॉर्डन आणि स्टायलिश लूकसाठी काही अभिनेत्रींनी परिधान केलेल्या सिल्क साडीच्या लूकबद्दल सांगणार आहोत. शिवाय, या सिल्क साड्या स्टाईल करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

रेड कलर सिल्क साडी

सिल्क साडी नेसायला अनेक महिलांना आवडते. सिल्क साडीमध्ये खास करून लाल रंग अधिक खुलून दिसतो. त्यामुळे, लाल रंगाच्या सिल्क साड्यांना महिलांची अधिक पसंती असते. लाल रंगाची सिल्क साडी तुम्ही लग्नसमारंभ, पूजा, रिसेप्शन किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी नक्कीच नेसू शकता.

खास करून नवविवाहित वधूंनी या प्रकारची साडी अवश्य नेसावी. या प्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. अभिनेत्री ईशा गुप्ताने ही लाल रंगाची सिल्क साडी सुंदर पद्धतीने नेसली आहे. या साडीवर तिने गोल्डन ज्वेलरी, लाल बांगड्या, कानात झुमके आणि वेल घातले आहेत. शिवाय, केसांची सुंदर वेणी आणि मिनिमल मेकअप करून लूकला चारचाँद लावले आहेत. तुम्ही देखील ईशाप्रमाणे सिल्क साडी स्टाईल करू शकता.

प्लेन सिल्क साडी

जर तुम्हाला साडीमध्ये मॉर्डन लूक हवा असेल तर तुम्ही प्लेन रंगाची सिल्क साडी नक्कीच नेसू शकता. प्लेन सिल्क साडीमुळे तुम्हाला मॉर्डन आणि स्टायलिश लूक मिळेल, यात काही शंका नाही. या प्रकारची कलमकारी डिझाईन असलेली सिल्क साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल.

विशेष म्हणजे या प्रकारच्या सिल्क साडीवर चंदेरी फ्रॅब्रिकचा ब्लाऊज अगदी खुलून दिसेल. तुमच्या साडीला सुंदर स्टायलिश लूक देखील मिळेल. अभिनेत्री ईशा गुप्ताने ही निळ्या रंगाची कलमकारी डिझाईन असलेली सिल्क साडी सुंदर पद्धतीने कॅरी केली आहे. या साडीवर तिने कुंदन ज्वेलरी, मिनिमल मेकअप आणि केसांचा सुंदर अंबाडा घातला आहे. तुम्ही देखील तिच्याप्रमाणे सिल्क साडी स्टाईल करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; रेल्वे वाहतूक ठप्प

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT