skin sakal
लाइफस्टाइल

Skin Care News : बदाम आणि मुलतानी मातीने बनवा स्क्रब, मिळेल चमकदार त्वचा!

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण सर्वजण आपल्या रोजच्या दिनचर्येत अनेक प्रकारच्या उत्पादनांचा समावेश करतो.

Aishwarya Musale

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण सर्वजण आपल्या रोजच्या दिनचर्येत अनेक प्रकारच्या उत्पादनांचा समावेश करतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती फेस मास्क वापरतो. पण केवळ फेस मास्क वापरणे पुरेसे नाही. आपण वेळोवेळी त्वचेला स्क्रब देखील करणे आवश्यक आहे.

स्किन एक्सफोलिएशन डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही त्वचेला एक्सफोलिएट करता तेव्हा त्यामुळे त्वचा चमकदार होते. जर तुम्ही घरी तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्याचा विचार करत असाल तर बदाम आणि मुलतानी मातीने फेस स्क्रब तयार करा. बदामामध्ये फॅटी ॲसिड भरपूर असते, तर मुलतानी माती त्वचेला खोलवर साफ करण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया मुलतानी माती आणि बदामाचा स्क्रब कसा बनवायचा.

बदाम, मुलतानी माती आणि गुलाब पाणी स्क्रब

लागणारे साहित्य-

  • 2 चमचे मुलतानी माती

  • 1 टेबलस्पून बदामाची पावडर

  • गरजेनुसार गुलाबपाणी

  • बदाम तेलाचे काही थेंब

स्क्रब बनवण्याची पद्धत-

सर्वप्रथम बदाम बारीक करून त्याची पावडर बनवा.

आता एका भांड्यात बदाम तेल, मुलतानी माती आणि बदाम पावडर एकत्र मिक्स करा.

पेस्ट बनवण्यासाठी हळूहळू गुलाब पाणी घाला.

आता तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि त्वचेवर लावा आणि मसाज करा.

शेवटी, कोमट पाण्याने त्वचा धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.

बदाम, मुलतानी माती आणि दही स्क्रब

बदलत्या ऋतूंमध्ये तुम्हाला तुमची त्वचा एक्सफोलिएट करायची असेल तर हा स्क्रब तयार करा.

लागणारे साहित्य-

  • 1 टेबलस्पून मुलतानी माती

  • 1 टेबलस्पून बदामाची पावडर

  • 1 टीस्पून दही

  • एक चिमूटभर हळद

वापरण्याची पद्धत-

सर्व प्रथम एका भांड्यात मुलतानी माती, बदाम पावडर, दही आणि हळद घालून मिक्स करा.

आता तुमची त्वचा स्वच्छ करा आणि लावा. 5 मिनिटं मसाज करा.

आता दहा मिनिटे असेच राहू द्या. शेवटी, कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

बदाम, मुलतानी माती आणि एलोवेरा जेल स्क्रब

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर बदाम, मुलतानी माती आणि एलोवेरा जेलपासून स्क्रब तयार केला जाऊ शकतो.

लागणारे साहित्य-

  • 1 टेबलस्पून मुलतानी माती

  • 1 टेबलस्पून बदामाची पावडर

  • 1 टीस्पून एलोवेरा जेल

वापरण्याची पद्धत-

एका भांड्यात एलोवेरा जेल, मुलतानी माती आणि बदाम पावडर घालून मिक्स करावे.

आता तुमची त्वचा स्वच्छ करा आणि तयार केलेला स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

5-10 मिनिटे चेहऱ्यावर तसेच ठेवा.

शेवटी, आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gevarai BJP Leader Balraje Pawar Arrest: गेवराईत भाजपच्या बाळराजे पवारांना मध्यरात्री अटक ; नगरपालिका मतदानाच्या दिवशी झाला होता राडा!

Thane News: उंच टॉवर, स्नो पार्क, टाउन पार्क आणि... ठाण्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार, भव्य प्रकल्पांची घोषणा

किती घाण दाखवताय... मराठी मालिकेतील नवऱ्याचा क्रूरपणा पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- आताचे पुरुष असे आहेत?

Pune Crime : फसवणूक प्रकरणात धनंजय वाडकर व त्याच्या जावयाच्या घरातून कागदपत्रे जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई!

Junnar Leopard Attack : ओतूरमध्ये दिवसा ढवळ्या बिबट्याचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी!

SCROLL FOR NEXT