लाइफस्टाइल

Olive Oil for Skin : झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ऑलिव्ह ऑईल, ग्लोइंग स्किनसह मिळतील अनेक फायदे

चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावण्याचे फायदे...

Aishwarya Musale

आपली त्वचा सुंदर दिसावी अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी आपण अनेकदा अनेक प्रकारचे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतो, परंतु ही बाह्य प्रोडक्ट्स त्वचेसाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकतात. कारण ते बनवण्यासाठी अनेक प्रकारची रसायने वापरली जातात.

घरात असलेले ऑलिव्ह ऑईल त्वचेच्या काळजीसाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी किती फायदेशीर आहे.

ऑलिव्ह ऑइल त्वचेला थंड ठेवण्यास मदत करते

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय चेहऱ्यावर काहीही लावू नये, असे म्हटले जाते की ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या संसर्गापासून आणि ऍलर्जीपासून आराम देण्यास मदत करतात. कारण ते त्वचेच्या आत जाते आणि कूलिंग इफेक्ट प्रदान करण्याचे काम करते.

ऑलिव्ह ऑइल त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करते

अनेकदा थंडीच्या मोसमात त्वचेतून ओलावा निघून जातो आणि त्वचा कोरडी होते. ऑलिव्ह ऑइल त्वचेला योग्य प्रमाणात पोषण देऊन मॉइश्चराइज ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ मऊ राहते. तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर याचा वापर करू शकता.

ऑलिव्ह ऑइल त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते

वयाबरोबर त्वचेत अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात आणि काही वेळा वयाच्या आधीच चेहऱ्यावर एजिंग साइंससारख्या सुरकुत्या दिसू लागतात. यासाठी आपण अनेकदा बाहेरच्या अनेक क्रीम्सचा वापर करतो, परंतु जर तुम्ही दररोज त्वचेवर ऑलिव्ह ऑईल वापरत असाल तर ते तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण आणि सुंदर राहण्यास मदत करेल.

ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला हायड्रेट ठेवू शकतात. त्याचबरोबर यामध्ये आढळणारे फॅटी ऍसिड त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइलने मसाज करावी लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT