skin care sakal
लाइफस्टाइल

Skin Care: त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!

शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्वचेची काळजी घेणेही गरजेचे आहे.

Aishwarya Musale

शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्वचेची काळजी घेणेही गरजेचे आहे. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या त्वचेतील कोलेजनचे उत्पादनही कमी होऊ लागते. यासोबतच त्वचेतून नैसर्गिक तेल आणि इलास्टिनही कमी होऊ लागते. अशा स्थितीत आपली त्वचा कोरडी होते, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात.

चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू नयेत, यासाठी तुम्हाला त्वचेची अत्यंत काळजी घ्यावी लागेल. आम्ही तुम्हाला त्वचेच्या काळजीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

माइल्ड क्लीन्सरचा समावेश करा

घराबाहेर पडल्यानंतर, आपल्या त्वचेला सूर्याच्या अतिनील किरण, धूळ आणि पाऊस यांसह अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी, रुटीनमध्ये माइल्ड क्लिंजरचा समावेश करा. यामुळे त्वचेवरील घाण आणि धूळ सहज स्वच्छ होईल. हे लक्षात ठेवा की माइल्ड क्लीन्सर तुमच्या त्वचेच्या प्रकाराचे असावे.

व्हिटॅमिन सी क्रीम वापरा

चेहऱ्यावर मुरुम आणि काळे डाग येण्याची समस्या असल्यास चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी क्रीम किंवा सीरम लावा. सीरम त्वचेचे वृद्धत्व पूर्ववत करण्यासाठी आणि काळे डाग कमी करण्यासाठी कार्य करते. सकाळी चेहरा धुतल्यानंतरच चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी क्रीम किंवा सीरम लावणे चांगले.

सनस्क्रीन लावा

सूर्याच्या अतिनील किरणांचा आपल्या त्वचेवर थेट परिणाम होतो. उन्हात बाहेर जात असाल तर सनस्क्रीन वापरा. त्वचा तज्ज्ञांच्या मते, किमान 30 एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरा.

चेहरा स्क्रब करा

चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी क्लिंजिंग आवश्यक असते. यासाठी चेहऱ्यावर स्क्रब करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा चमकदार दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT