लाइफस्टाइल

Skin Care : न्यू इयर पार्टीसाठी तुम्हाला ग्लोइंग स्किन हवीये? मग हे फेस पॅक नक्की ट्राय करा

चमकदार त्वचा हवीये? मग हे घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Aishwarya Musale

आपला चेहरा नेहमी सुंदर दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: एखादा कार्यक्रम असेल तेव्हा चेहऱ्याची चमक कायम राखणे खूप गरजेचे असते. तुम्हालाही ग्लोइंग स्किन मिळवायची असेल, तर आम्ही तुम्हाला काही फेस पॅकबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

खरं तर, नवीन वर्ष येणार आहे, अशा परिस्थितीत लोक न्यू इयर पार्टीचे आयोजन करतात. अशा परिस्थितीत पार्टीला जाण्यापूर्वी प्रत्येकजण आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करतात. बाजारात अनेक रेडिमेड फेस पॅक उपलब्ध असले तरी त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही.

अशा परिस्थितीत बरेच लोक हे पॅक वापरण्याऐवजी घरगुती फेस पॅकवर अधिक अवलंबून असतात. या कारणास्तव, आज आम्ही तुम्हाला अशाच काही पॅकबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही जास्त पैसे खर्च न करता वापरू शकता.

दूध आणि हळद

हळद आणि दुधामध्ये अनेक घटक आढळतात, जे त्वचा चमकदार बनवण्यास मदत करतात. जर तुम्ही हा पॅक वापरलात तर तुमच्या चेहऱ्यावरही चमक येईल. यासाठी एका भांड्यात दुधात थोडी हळद मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

दही आणि मध

हिवाळ्यात चेहऱ्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मध आणि दही वापरता येते. जर तुम्हाला हा पॅक वापरायचा असेल तर एका भांड्यात दही आणि मध मिसळून फेस पॅक तयार करा. ते चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

पपई आणि मध

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी पपई आणि मधाचा वापर केला जाऊ शकतो. ते तयार करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला पपई ब्लेंडरमध्ये बारीक करून त्यात थोडे मध घालावे लागेल. आता ते चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे कोरडे राहू द्या, त्यानंतर मलाईने मसाज करा. शेवटी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

लिंबू आणि मध

जर तुम्हाला हा पॅक वापरायचा असेल तर प्रथम लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण तयार करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा, नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

तांदूळ आणि बेसन

हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरील काळी वर्तुळे कमी करण्याचे काम करतो. ते वापरण्यासाठी सर्वप्रथम तांदळाचे पीठ घेऊन त्यात थोडे बेसन मिसळावे लागेल. आता शेवटी टोमॅटोचा रस घालून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT