skin  sakal
लाइफस्टाइल

Skin Care : चेहरा स्वच्छ करताना तुम्हीही या चुका करता का? पडू शकतात डाग, पिंपल्सचाही असतो धोका

चेहरा स्वच्छ करताना तुम्हीही या चुका करता का? जाणून घ्या

Aishwarya Musale

चेहऱ्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी महिला अनेक घरगुती उपाय करतात आणि अनेक प्रोडक्ट्सचा वापरही करतात, पण या सगळ्यामध्ये स्त्रिया अशा काही चुका करतात ज्यामुळे चेहरा खराब होतो आणि चेहरा साफ करताना या चुका होतात. बहुतेक महिलांना या चुका माहीत नसतात आणि काही वेळा या चुका करून चेहऱ्याची चमकही हरवते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमचा चेहरा साफ करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून चेहऱ्याची चमक कायम राहील आणि चेहऱ्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

चुकीच्या फेस वॉशचा वापर करणे

अनेकदा स्त्रिया आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉशचा वापर करतात, परंतु जर तुम्ही चेहरा साफ करताना चुकीच्या फेसवॉशचा वापर केला तर त्यामुळे चेहऱ्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. फेस वॉश वापरण्यापूर्वी हे लक्षात ठेवले पाहिजे, की फेस वॉशमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी तुमच्या त्वचेला सूट होतात की नाही आणि त्यानंतरच फेस वॉश वापरा.

साबणाचा वापर

चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी फेस वॉशचा वापर करायला हवा. अनेकांना हे माहीत असूनही लोक घाईत चेहरा साबणाने स्वच्छ करण्याची चूक करतात. त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. 

मेकअपसह चेहरा धुणे

मेकअपसह चेहरा धुण्याची चूक करू नये. फेसवॉशने चेहऱ्यावरील मेकअप काढताना चेहऱ्यावर थोडासा मेकअप राहतो आणि त्यात केमिकल असते. त्यामुळे ही चूक करणे टाळा. 

गरम पाणी वापरणे टाळा

तसेच चेहरा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाणी वापरल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होते. तसेच गरम पाण्याने चेहरा स्वच्छ करताना इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी टिप्स:

माईल्ड फेस वॉश वापरा.

मॉइश्चरायझर वापरा.

चेहरा धुण्यापूर्वी हात धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT परिसरात मराठा आंदोलकाला हृदयविकाराचा झटका, बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वाचवला जीव

Diabetes Control Tips: मधुमेहाला कायमच बाय- बाय म्हणायचं? मग लगेच या 6 गोष्टी सोडा; अन्यथा 5 अवयव होऊ शकतात खराब!

Fulambri News : प्रशांत नागरे यांच्या पुढाकाराने फुलंब्रीत नळकांडी पुलाचे स्वखर्चाने बांधकाम

Latest Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी सुरू

Satyanarayan Puja Special: सत्यनारायण पूजेसाठी खास! केळ, तूप, तुळस आणि वेलचीच्या सुवासातील गोड व सुगंधी प्रसादाचा शिरा

SCROLL FOR NEXT