Skin  sakal
लाइफस्टाइल

Skin Care: हिवाळ्यात 'या' चुका कराल तर त्वचा नेहमीच राहील कोरडी, जाणून घ्या

जर तुम्हाला हिवाळ्यात त्वचेच्या कोरडेपणाची समस्या सतावत असेल तर या चुका करणे टाळावे.

Aishwarya Musale

हवामानासोबत त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर हिवाळा येणार आहे आणि त्यामुळे त्वचेतील कोरडेपणा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, परंतु जर तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेतली तर तुमची त्वचाही निरोगी होऊ शकते.

बर्‍याचदा त्वचेला योग्य पोषण न मिळाल्याने त्वचा कोरडी पडते, परंतु काहीवेळा नकळत चुकीचे स्किन केअर स्टेप फॉलो केल्याने त्वचा निर्जीव दिसू शकते. तर, आज आम्ही तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यांमुळे तुमची त्वचा आणखी कोरडी होऊ शकते.

स्क्रबिंग करा

स्किन पोर्स स्वच्छ करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डेड स्किनचा लेयर दूर करण्यासाठी वेळोवेळी फेस स्क्रब करणे आवश्यक आहे, परंतु हिवाळ्याच्या हंगामात त्वचा आधीच कोरडी असते आणि वारंवार फेस स्क्रबचा वापर केल्याने त्वचा सोलली जाते आणि कोरडेपणाही वाढू शकतो. यासाठी आठवड्यातून एकदाच फेस स्क्रब वापरा आणि स्क्रब केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

त्वचेच्या टेक्स्चरनुसार इंग्रेडिएंट न निवडणे

चेहऱ्यावर कोणतीही गोष्ट लावण्यापूर्वी तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे की हा इंग्रेडिएंट तुमच्या त्वचेला सूट होईल की नाही? आपण यासाठी पॅच टेस्ट करतो, परंतु बरेचदा आपण मोठ्या ब्रँड्स आणि जाहिराती पाहूनच उत्पादन खरेदी करतो. यामुळे आपली त्वचा खराब होऊ शकते आणि त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो. यासाठी सर्वप्रथम तुम्ही त्वचेचा प्रकार आणि टेक्स्चर समजून घ्या आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्वचा तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता.

त्वचेला हायड्रेट न ठेवणे

तुम्ही आठवड्यातून 3 वेळा चेहऱ्यावर शीट मास्क वापरावा. याशिवाय तुम्ही तुमच्या दैनंदिन त्वचेच्या काळजीमध्ये फेस ऑइल आणि सीरमचा समावेश करावा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

Pune News : थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत; प्रशासनाचा इशारा

SCROLL FOR NEXT