skin care sakal
लाइफस्टाइल

Skin Care : ना केमिकलची भीती, ना खिशाला बसणार चाट.. घरच्या-घरी तयार करता येईल 'सनस्क्रीन'

घरच्या-घरी सनस्क्रीन तयार करू शकता; स्वस्तात मस्त आणि केमिकल फ्री

Aishwarya Musale

त्वचेची काळजी घेण्यासाठी आज-काल भरपूर सौंदर्य उत्पादने वापरली जातात. सनस्क्रीन क्रीम किंवा बॉडी लोशन देखील बहुतेक लोकांच्या स्कीन केअरचा एक महत्त्वाचा भाग असतो. बाजारात अनेक प्रकारची सनस्क्रीन क्रीम्स उपलब्ध आहेत जी महिला त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरतात परंतु ही उत्पादने इतकी महाग आहेत ज्यामुळे प्रत्येकजण ती घेऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही घरी सनस्क्रीन बनवू शकता.

या गोष्टींच्या मदतीने सनस्क्रीन बनवता येते

तेलकट त्वचेसाठी एलोवेरा जेलच्या मदतीने सनस्क्रीन क्रीम बनवता येते, तर कोरड्या त्वचेसाठी पपईच्या जेलच्या मदतीने सनस्क्रीन क्रीम बनवता येते.

अशा प्रकारे सनस्क्रीन बनवा

एलोवेरा जेलमध्ये अँटी-सेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी असते जे त्वचेसाठी फायदेशीर असते, एलोवेरा जेलचा वापर चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी केला जातो, तसेच एलोवेरा जेलचा वापर सनस्क्रीन क्रीम बनवण्यासाठी देखील केला जातो. पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि बायोफ्लाव्होनॉइड्स असतात ज्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास आणि मुरुम काढून टाकण्यास मदत होते आणि पपई जेल वापरून घरी सनस्क्रीन क्रीम बनवता येते.

तेलकट त्वचेसाठी, गुलाबपाणी आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये एलोवेरा जेल मिसळून सनस्क्रीन क्रीम बनवता येते, आणि कोरड्या त्वचेसाठी, पपईच्या जेलमध्ये गुलाबजल आणि व्हिटॅमिन-ई कॅप्सूल मिसळून सनस्क्रीन क्रीम बनवता येते. या सनस्क्रीन क्रीम्स घरच्या घरी बनवता येतात.

घराबाहेर पडताना काही वेळापूर्वी सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन लावा. लक्षात ठेवा, सनस्क्रीनचा त्वचेवर परिणाम व्हायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन लावण्याऐवजी ते थोडे आधी लावणे चांगले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT