लाइफस्टाइल

Skin Care : ड्राय ब्रशिंगमुळे त्वचेचं होतं नुकसान, टाळण्यासाठी फॉलो करा या सेफ्टी टिप्स

तुम्ही ड्राय ब्रशिंगचा वापर चुकीच्या पद्धतीने केला तर त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.

Aishwarya Musale

थंडीच्या दिवसात त्वचेवर डेड स्किन सेल्स जमा होऊ लागतात. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव दिसते. अशा परिस्थितीत, डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी आणि टॅन त्वचेपासून मुक्त होण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. सामान्यतः अशा परिस्थितीत लोक स्क्रबिंगला प्राधान्य देतात. पण याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ड्राय ब्रशिंगचा पर्यायही निवडू शकता.

तुमच्या त्वचेची काळजी घेण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. ड्राय ब्रशिंग करणे खूप सोपे आहे. परंतु इतर कोणत्याही सौंदर्य उपचारांप्रमाणे, ड्राय ब्रशिंगची देखील स्वतःची पद्धत आहे. जर तुम्ही ड्राय ब्रशिंगचा वापर चुकीच्या पद्धतीने केला तर त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेफ्टी टिप्स सांगत आहेत, ज्या तुम्ही ड्राय ब्रश करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

योग्य ब्रश निवडावा

तुम्ही ड्राय ब्रशिंग करत असताना, तुम्ही कोणत्या प्रकारचा ब्रश वापरत आहात याकडे सर्वप्रथम लक्ष दिले पाहिजे. एवढेच नाही तर ते नेहमी कोरड्या त्वचेवरच वापरावे. तुम्ही ते ओल्या किंवा ओलसर त्वचेवर वापरल्यास तुम्हाला इरिटेशन होऊ शकते.

हायड्रेट करा

ड्राय ब्रशिंग त्वचेसाठी खूप चांगले असते, पण त्यानंतरही तुम्हाला तुमच्या त्वचेची तितकीच काळजी घ्यावी लागते. नेहमी लक्षात ठेवा की ड्राय ब्रशिंगनंतर त्वचेला हायड्रेटिंग लोशन किंवा तेलाने मॉइश्चरायझ करा. यामुळे तुमच्या त्वचेला आराम तर मिळतोच, पण ड्राय ब्रशिंगचेही पूर्ण फायदे होतात.

ब्रश साफ करण्याकडे दुर्लक्ष करू नका

जेव्हा ड्राय ब्रशिंगशी संबंधित सेफ्टी टिप्स चा विचार केला जातो, तेव्हा तुम्ही ब्रशच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. एकदा तुम्ही ड्राय ब्रशिंग केले की, डेड स्किन सेल्स ब्रशच्या ब्रिस्टल्सवर अडकतात. म्हणूनच, डेड स्किन सेल्स आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी प्रत्येक वापरानंतर ब्रश स्वच्छ करा. यासाठी काही माइल्ड साबण आणि पाण्याची मदत घ्या. यानंतर ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT