लाइफस्टाइल

Skin Care : हिवाळ्यात मॉइश्चराइजरचा अतिवापर करताय? यामुळे होऊ शकते तुमची त्वचा खराब

जेव्हा थंड हवामान येते तेव्हा मॉइश्चरायझर आपल्या त्वचेचा साथीदार बनतो. थंड वाऱ्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो.

Aishwarya Musale

जेव्हा थंड हवामान येते तेव्हा मॉइश्चरायझर आपल्या त्वचेचा साथीदार बनतो. थंड वाऱ्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. अशा परिस्थितीत आपण आपल्या त्वचेची आर्द्रता राखण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करतो. ज्यांची त्वचा कोरडी आहे ते लोक दिवसातून दोन ते तीन वेळा मॉइश्चरायझरचा वापर करतात.

तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता. परंतु जेव्हा तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त मॉइश्चरायझर लावता तेव्हा त्यामुळे तुमच्या त्वचेला काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. तर, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत की जास्त मॉइश्चरायझर वापरल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते.

पोर्स क्लॉग होणे

जर तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट करण्यासाठी जास्त मॉइश्चरायझर वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेचे छिद्र बंद करू शकते. हिवाळ्यात आपण सर्वच थिक मॉइश्चरायझर वापरत असल्याने ही शक्यता आणखी वाढते. जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरत असाल ज्यामध्ये कॉमेडोजेनिक घटक असतील तर तुम्हाला ब्रेकआउट आणि इतर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

त्वचा चिकट वाटणे

अनेक वेळा आपल्याला वाटतं की हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी असते, त्यामुळे अशा परिस्थितीत आपण खूप जास्त मॉइश्चरायझर वापरू शकतो. त्वचा ते सहजपणे शोषून घेईल. तर प्रत्यक्षात तसे नाही. जेव्हा तुम्ही जास्त मॉइश्चरायझर लावता तेव्हा तुमची त्वचा चिकट होते. यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. जर तुम्ही चेहऱ्यावर जास्त मॉइश्चरायझर लावले तर त्यामुळे मेकअप करण्यात अडचण येऊ शकते.

त्वचेचा निस्तेजपणा

जास्त मॉइश्चरायझर देखील तुमची त्वचा निस्तेज करू शकते. त्वचा अतिरिक्त मॉइश्चरायझर शोषत नाही, ज्यामुळे ते तुमच्या त्वचेवर राहते. त्यामुळे धुळीचे कण तुमच्या त्वचेवर चिकटून राहतात. इतकेच नाही तर जास्त मॉइश्चरायझरमुळे तुमच्या त्वचेचे नैसर्गिक सेबम उत्पादन कमी होते, ज्यामुळे त्वचेला पोषक तत्वांची कमतरता भासते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT