Ice Facial sakal
लाइफस्टाइल

Ice Facial Tips: चेहऱ्यावर बर्फ लावणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या

चेहऱ्यावर लावा बर्फ, त्वचेच्या अनेक समस्या होतील दूर

Aishwarya Musale

बदलत्या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या बदलत्या ऋतूमध्ये त्वचेशी संबंधित समस्या होणे सामान्य आहे. पावसाळ्यात लोकांना खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, चेहऱ्याच्या अनेक प्रकारच्या समस्यांचा त्रास होतो.

या ऋतूमध्ये तुम्ही चेहऱ्याची निखारता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्सचा वापर करत असाल. पण त्यात फारसा फरक पडणार नाही. दुसरीकडे, जर तुम्ही घरात असलेल्या काही गोष्टी वापरल्या तर तुम्हाला पावसाळ्यातही चमकदार त्वचा मिळेल. यासोबतच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर बर्फ लावून फेशियल केल्याने काय फायदे होतात ते सांगणार आहोत.

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने काय फायदे होतात?

1. गलोविंग स्किन

फेस आयसिंग म्हणजेच चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते. यामुळे पिंपल्सची समस्याही दूर होते. तसेच, त्वचेची काळजी घेण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. यामुळे चेहऱ्याला एक अप्रतिम ग्लो येतो.

2. मुरूमांपासून बचाव

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल तर बर्फाने फेशियल करा. चेहऱ्यावर बर्फ लावून फेशियल केल्याने त्वचेची सूज कमी होते. यामुळे मुरुम हळूहळू बरे होऊ लागतात. हे तुमच्या छिद्रांचा आकार वाढण्यापासून प्रतिबंधित करते.

3. डार्क सर्कल कमी करते

आईस फेशियलमुळे तुमच्या चेहऱ्याची सूज कमी होते. म्हणूनच तुम्ही नियमितपणे फेस आयसिंग केली पाहिजे. यामुळे तुमच्या डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमध्येही हलकापणा येतो.

4. स्किन एक्सफोलिएशन 

बर्फ हा सर्वोत्तम नॅचरल एक्सफोलिएटर आहे. यासाठी दुधापासून बर्फ बनवा आणि नंतर ते चेहऱ्याला लावा. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे डेड स्किन काढण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT