Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips: चेहऱ्याला उजळवतं Vitamin C; हे पदार्थ लावा अन् डागविरहीत त्वचा मिळवा!

चेहरा चमकदार करायला आपल्याला Vitamin-C युक्त फळे

Pooja Karande-Kadam

Skin Care Tips: एखाद्या शुभ कार्यात तुम्ही छान दिसत असाल. हेवी ड्रेस, स्टायलीश सँडल घातलेत, आणि तुमचा चेहराच उठून दिसत नसेल तर विचित्र वाटतं. शेवटी नॅचरल ब्युटीशिवाय पर्याय नाही. कितीही मेकअप केला तरी चेहऱ्यावरचे डाग झाकले जात नाहीत.

हेवी मेकअप आणि इतर प्रोडक्टने तुम्ही तात्पुरते गोरे व्हाल पण खरा ग्लो हवा असेल तर थोडी मेहनत तर तुम्ही घेतलीच पाहिजे. चेहऱ्याला रसायनयुक्त गोष्टी त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसानच करतात. त्यामुळे स्किनकेअर रुटीनमध्ये तुम्ही या नैसर्गिक गोष्टींचा समावेश करू शकता, ज्यामुळे चेहऱ्याची चमक वाढेल.

चेहरा चमकदार करायला आपल्याला Vitamin-C युक्त फळे आणि भाज्या चेहऱ्यावर लावता येतात. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया, कोणती फळे आणि भाज्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

केळी

ऊर्जासंपन्न हे फळ अनेक प्रकारच्या समस्या दूर करते. केळी खाणे खूप फायदेशीर मानले जाते. यात कॅल्शियम, डायटरी फायबर आणि अनेक पोषक घटक असतात. पण तुम्हाला माहित आहे का, केळी हे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर फळ आहे. त्यापासून तुम्ही फेस मास्क तयार करू शकता. ज्यामुळे त्वचा चमकदार होते. (Skin Care Tips)

लिंबू

लिंबूमध्ये Vitamin-C भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे त्वचा शुद्धकरण्याचे काम करते. चेहऱ्यावर लिंबू वापरण्यासाठी एक चमचा लिंबाच्या रसात चिमूटभर कॉफी पावडर मिसळून नंतर चेहऱ्यावर स्क्रब करा. काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाका.

संत्री

संत्रा आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम अशी पोषक तत्वे या फळात आढळतात. चमकदार त्वचेसाठी तुम्ही संत्र्यांचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा बेसन घेऊन त्यात संत्र्याचा रस मिसळावा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

15 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. याशिवाय संत्र्याची साल उन्हात वाळवावी. त्याची पावडर तयार करून त्यात गुलाबजल मिसळावे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवून घ्या.(Face Pack)

टोमॅटो

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-सी आणि लाइकोपीन सारख्या पोषक तत्वांचे प्रमाण भरपूर असते. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास खूप मदत होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोज टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे वृद्धत्वाची चिन्हे टाळली जातात.(Tomatos)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT