should not eat these food items 
लाइफस्टाइल

त्वचा मुलायम आणि सुंदर ठेवायची असेल तर या पदार्थांचं सेवन टाळा

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: त्वचेची निगा चांगली राखायची असेल तर आहारावर लक्ष दिलं पाहिजे. आपण जर शरीराला आवश्यक आणि पौष्टीक आहार घेतला तर आपले आरोग्यही उत्तम राहते. तसेच चांगला आहार त्वचेसाठीही फायदेशीर असतो. त्वचा चांगली आणि मुलायम राहण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा कोणते पदार्थ टाळले पाहिजेत याची माहिती घेऊया.

1. कार्बोहाइड्रेट: कार्बोहायड्रेट आपल्या शरीरासाठी आवश्यक घटकांपैकी एक घटक आहे. परंतु त्याचं आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन केल्यास ते त्वचेसाठी हानिकारक ठरतं. रिफाइंड व्हाईट शुगर, तांदूळ, मैदा आणि पास्तासारख्या गोष्टींमध्ये कार्बाचे प्रमाण जास्त असते. जे त्वचेवर थेट वाईट परिणाम करू शकतात. त्यामुळे या पदार्थांचे अति सेवन टाळले पाहिजे.

2. रेड मीट: जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर रेड मीटचे सेवन कमी केले पाहिजे. कारण रेड मीटचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यात सॅचूरेटेड फॅटचं प्रमाण खूप जास्त असते, जे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं.

3. प्रोसेस्ड फूड:  या पदार्थांचं सेवनही आरोग्याला आणि त्वचेसाठी घातक ठरत असतं. यामध्ये क्रिमची बिस्कीटे, कुकीज, केक यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ बनवताना नेहमी डालडा वापरला जातो जे एक ट्रांसफॅट असल्याने ते शरीरासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक असते.

4. तळलेले पदार्थ: अशा पदार्थांचं सेवन फक्त त्वचेसाठी चांगलं नसून ते आरोग्यासाठीही खूप धोकादायक असतं. यामध्ये कचोरी, वडापाव, समोसा, पकोडा भजी अशा पदार्थांचा समावेश होतो. यामुळे हे पदार्थ टाळले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT