Winter Skin Care  esakal
लाइफस्टाइल

Winter Skin Care : थंडीत त्वचा तडतडते? मग साबणाऐवजी वापरा फक्त या ३ गोष्टी

थंडी आली की त्वचेच्या आजारांना आयत आमंत्रण

सकाळ डिजिटल टीम

Winter Skin Care : थंडी आली की त्वचेच्या आजारांना आयत आमंत्रण मिळतं; त्यात त्वचा तडतडण, कोरडी आणि रुक्ष होण, रॅश येणं हे खूपच नॉर्मल आहे; पण याच्याकडे दुर्लक्ष करणं चांगल नाही.थंडीच्या दिवसांत वातावरणातल्या हवेत कोरडेपणा असतो त्यामुळे आपली त्वचा खूप तडतडते.

त्वचा कोरडी पडल्याने अंगाला खाज येणे, त्वचेवर डेड स्किन तयार होणे अशा समस्या तयार होतात. अनेकदा कोरड्या त्वचेवर मेकअपही नीट बसत नाही. त्यामुळे थंडीतही त्वचा ग्लोईंग आणि मुलायम दिसावी यासाठी आपण त्वचेला तेल किंवा मॉईश्चरायजर लावतो.

साबणामुळेही थंडीच्या काळात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. आंघोळ करताना आपण साबण किंवा बॉडी वॉश वापरत असू तर त्यातील रासायनिक घटकांमुळे सुद्धा त्वचा कोरडी होते. आता हे तर अशक्यच आहे की साबण न लावता आंघोळ करणं कारण शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा घामाचा वास जाण्यासाठी साबण तर लावायलाच हवा ना! म्हणून अशावेळी साबणाला काय पर्याय असू शकतात?

१. साय किंवा दूध

आंघोळीच्या वेळी साबण लावण्याऐवजी आपण साय किंवा दुध अंगाला लावू शकतो. त्यामुळे शरीराला कोरडेपणा न येता चांगले मॉईश्चर मिळण्यास मदत होते. सायीमध्ये असणारे स्निग्ध पदार्थ त्वचेला पोषण देणारे ठरत असल्याने थोडीशी साय आणि हळद, चंदन पावडर किंवा मुलतानी माती किंवा मसुरीच्या डाळीचं पीठ एकत्र करुन ती आंघोळीच्या वेळी साबणासारखी लावल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

२. उटणे

उटणं म्हटल की दिवाळीच्या चार दिवसात वापरायची गोष्ट असं प्रत्येकाला वाटत पण अस नाहीये; उलट पूर्ण हिवाळा उटण वापरणं खूप फायदेशीर आहे. उटण्यामध्ये बरेच आयुर्वेदीक घटक असतात, त्यामुळे त्वचा मुलायम होते. यामध्ये दूध किंवा पाणी घालून त्याने त्वचेला मसाज केल्यास त्वचेवरची घाण आणि डेड स्किन निघून जाते.

३. घरगुती पॅक

लहान बाळांना जन्मल्यानंतर मसूर डाळीचे पीठ - हळद किंवा बेसनाचे पीठ आणि दूध अशाप्रकारचा पॅक शरीर स्वच्छ करण्यासाठी लावतात. बाळांची त्वचा कोमल असल्याने त्यांच्या त्वचेला रासायनिक घटक लागू नयेत यासाठी हे उपाय केले जातात. थंडीच्या दिवसांत आपलीही त्वचा नाजूक होते, अशावेळी आपणही हे उपाय शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर उद्योगाला चालना मिळणार; डिझेलमध्ये ‘बायो-आयसोब्युटेनॉल’ मिश्रणाचा पर्याय, कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड नाही!

Battery : कितीही अन् कसं ही वापरा! 433 वर्षांपर्यंत चालेल 'ही' बॅटरी; NASA ने बनवला असा 'सेल' जो 5 पिढ्यांपर्यंत पुरवेल वीज

Latest Marathi News Live Update : यावेळी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणू - ममता बॅनर्जी

Nanded News: हळदीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत; स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केंद्रीय संस्थांकडे तक्रार

"प्रियाचं जाणं दुर्दैवी पण" पत्नीच्या मृत्यनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला नवरा शंतनु; "त्या लढाईत आम्ही हरलो"

SCROLL FOR NEXT