Avoid Sleep During Work sakal
लाइफस्टाइल

Avoid Sleep During Work: ऑफिसमध्ये काम करताना येते झोप , मग या 5 टिप्स नक्की फॉलो करा

निरोगी राहण्यासाठी झोप खूप आवश्यक आहे.

Aishwarya Musale

झोप निरोगी राहण्यासाठी खूप आवश्यक आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. त्यामुळे आरोग्यासोबतच दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे. मग ते घरातील काम असो किंवा ऑफिसचे काम.

ऑफिसमध्ये अनेकांना काम करताना झोप येत असते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे उपाय करता, जास्त प्रमाणात चहा-कॉफी पिणे इ. यामुळे तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आम्ही तुम्हाला आज अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहू शकता.

रात्री चांगली झोप घ्या

रात्री पुरेशी झोप न मिळाल्यास दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या कामात झोपेची समस्या उद्भवू शकते. चांगल्या आरोग्यासाठी रोज रात्री ७-८ तास झोपा. यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटेल आणि व्यवस्थित कामही करता येईल.

हायड्रेटेड रहा

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, तुम्हाला कामाच्या दरम्यान थकवा जाणवतो आणि झोप येते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ताज्या फळांचा ज्यूस देखील पिऊ शकता.

हेल्दी नाश्ता करा

थकवा दूर करण्यासाठी, आपण आरोग्यदायी गोष्टी खाव्यात, यासाठी आपण आपल्या डेस्कवर हेल्दी स्नॅक्स ठेवावे, जसे की ताजी फळे, काजू. या गोष्टी खाल्ल्याने तुमचा उत्साह वाढेल.

एक छोटा ब्रेक घ्या

कामाच्या दरम्यान शॉर्ट ब्रेक घेतल्याने तुम्हाला आराम वाटेल आणि तुमची उत्पादकता देखील सुधारेल. तुम्ही शॉर्ट ब्रेकमध्ये हेल्दी स्नॅक्स घेऊ शकता. तुम्ही ब्रेकमध्ये काही वेळ फिरू शकता. यामुळे तुमचे आरोग्यही सुधारेल.

डोळ्यांना आराम द्या

सतत कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहिल्याने डोळे थकतात आणि झोप येते. तज्ञांच्या मते, प्रत्येक 20-30 मिनिटांनी स्क्रीनपासून दूर पाहावे जेणेकरून डोळ्यांना काही काळ विश्रांती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ

SCROLL FOR NEXT