Sleeping sakal
लाइफस्टाइल

घोरणे वाढले, झोप बिघडली...

गाढ झोपेत जाणार इतक्यात कानावर येणारा ‘तो’ आवाज...

सकाळ वृत्तसेवा

गाढ झोपेत जाणार इतक्यात कानावर येणारा ‘तो’ आवाज... आणि क्षणात होणारे झोपेचे खोबरे... हल्ली ६० टक्के नागरिकांना याच अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. तो आवाज म्हणजे घोरणे. केवळ घोरण्याच्या सवयीमुळे अनेकांची झोप उडाल्याचे एका सर्वेक्षणातून आढळले आहे. यामध्ये ४० ते ७० वयोगटातील नागरिकांची संख्या सर्वाधिक असल्याचेही समोर आले आहे.

गेल्या आठवड्यात ‘जागतिक झोप दिना’निमित्त ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाने झोपेच्या पद्धती आणि झोपेच्या बिघाडाबाबत मूलभूत माहिती असण्याचे प्रमाण याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी एक ऑनलाईन सर्वेक्षण केले. रुग्णालयातील पल्मोनरी मेडिसिन विभागातील डॉ. तरंग कुलकर्णी यांनी या सर्वेक्षणाची आखणी केली होती. या सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या व्यक्ती मुख्यत्वे ४५ ते ७० वर्षे वयोगटातील होत्या.

या सर्वेक्षणात सुमारे ५०० जणांची चाचपणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ६० टक्के नागरिकांनी घोरण्यामुळे झोपेत अडथळा येत असल्याचे मान्य केले; तर सुमारे १५ टक्के व्यक्तींनी रात्री श्वास बंद होण्यामुळे त्यांच्या झोपेत अडथळा येत असल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या अनेक समस्यांमध्ये आता झोप न येण्याची भर पडली आहे. घोरणे हासुद्धा एकप्रकारचा विकार असून संभाव्य गंभीर आजाराची ती नांदीही असू शकते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

५० टक्के लोक अनभिज्ञ

झोपेच्या बिघाडाविषयी जाणीव जागृतीचा खूप अभाव आहे. झोपेत तीव्र स्वरूपात श्वास बंद होत असल्यामुळे लठ्ठपणाच्या आजारात वाढ होत आहे. लठ्ठपणामुळे पुढील गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे जनजागृती आवश्यक असल्याचे स्लीप लॅबचे प्रमुख झोपेचे तज्ज्ञ डॉ. मानस मेंगर यांनी सांगितले.

७ तासांपेक्षा कमी झोप

निरोगी प्रौढ व्यक्तींना दररोज ७-८ तास, तान्ह्या बालकांना आणि लहान मुलांना १० तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ झोपेची गरज असते. मात्र सुमारे ७० टक्क्यांहून अधिक व्यक्तींना रोज ७ तासांपेक्षा कमी वेळ झोप मिळते, असे डॉ. अल्पा दलाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT