sleeping time sakal
लाइफस्टाइल

तुम्हीही पोटाच्या भारावर झोपण्याची चूक करता का? जाणून घ्या दुष्परिणाम

तुम्हीही पोटाच्या भारावर झोपता का? झोपत असाल तर ही सवय आजच बदला

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला झोप प्रिय असते. प्रत्येकाला त्याच्या कम्फर्टनुसार हव्या त्या पोझिशनमध्ये झोपायला आवडते. दिवसभराच्या थकव्यानंतर तर रात्री मनसोक्त झोपावसं वाटतं. कित्येकजण आरामदायी वाटावं म्हणून पोटाच्या भारावर झोपतात. तुम्हीही पोटाच्या भारावर झोपता का? झोपत असाल तर ही सवय आजच बदला कारण याचे दुष्परिणाम अनेक आहे. आज आपण याच दुष्परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.

१. पोटाच्या भारावर झोपले की त्याचा थेट परिणाम मनक्यावर होतो. मनक्यावर ताण वाढतो. ज्यामुळे कंबर दुखते. जेव्हा तुम्ही पोटाच्या भारावर झोपता तेव्हा मणक्याची पोझिशन योग्य ठेवावी.

२. पोटाच्या भारावर झोपल्यामुळे मानसुद्धा दुखते. शक्यतो अशा पोझिशनमुळे पाठीचा कणा सरळ रेषेत नसतो त्यामुळे मानेवर त्याचा विपरीत परिणाम पडतो.

३. पोटावर झोपत असाल तर पाठीवर वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता असते. तुम्हीही पोटावर झोपत असाल तर आजच ही सवय बदला.

४. तुम्ही पोटावर झोपल्यास तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटावर झोपल्यामुळे रक्तपुरवठा डोक्यापर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे डोक्यावर ताण पडतो.

५. पोटावर झोपल्याने अपचनाच्या समस्यासुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास पोटावर झोपणे टाळावे.

६. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भवती महिलांनी कधीच पोटाच्या भारावर झोपू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT