Snacks For Diabetics esakal
लाइफस्टाइल

Snacks For Diabetics:  मधुमेहाच्या रूग्णांना द्या हाच नाश्ता, झटक्यात रक्तातली साखर वितळते की नाही पहाच!

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता सर्वात महत्त्वाचा असतो

Pooja Karande-Kadam

Snacks For Diabetics: WHO ने एका सर्व्हेद्वारे जाहिर केलं आहे की, लवकरच अर्ध्याहून अधिक जग मधुमेहाच्या आहारी जाणार आहे. याचे कारण जगभरात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी होय.

या आजारात किडनी, डोळे, यकृत, हृदय आणि इतर अनेक अवयव कमकुवत होतात. मधुमेहावर कोणताही इलाज नाही, पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहार आणि जीवनशैलीत बदल करून रक्तातील साखरेची पातळी सामान्य केली जाऊ शकते.

केवळ भारताचा विचार केला तर भारतातही घरोघरी एखादा रूग्ण असतोच ज्याला मधुमेहाचा त्रास होत असतो. मधुमेहाच्या रूग्णांना खाण्यापिण्यावर अनेक बंधन असतात. पण त्यांनी उपाशी राहील्याने त्यांच्या रक्तातील साखर वाढू अथवा कमी होऊ शकते.

अशावेळी मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता सर्वात महत्त्वाचा असतो. जर तुम्हालाही साखर वाढण्याची चिंता वाटत असेल, तर या गोष्टींचा नाश्तामध्ये नक्की समावेश करा.

पालक चाट

पालक ही एक पौष्टीक भाजी म्हणून ओळखली जाते. यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. हे खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सुधारते. पालकाच्या पानांपासून बनवलेली चटपटीत चाट मधुमेहाच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी ठरू शकते. तुम्ही ते नाश्ता म्हणून खाऊ शकता.

मसूर डाळ चिला

डाळीचा चिला भारतीय नाश्त्यामध्ये खूप लोकप्रिय आहे. मसूर डाळ चीला मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. या मसूराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. याशिवाय या डाळीमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असते.

मसूरच्या डाळीची पेस्ट करून मिश्रण तयार करा, त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि मीठ घालून कमी तेलात हा चीला बनवा. (Recipes)

डाळीचा चिला भारतीय नाश्त्यामध्ये खूप लोकप्रिय आहे

भाजलेले काजू

काजू प्रमाणात खाल्ले तर ते आरोग्यासाठी चांगले आहेत. तसेच, मधुमेह असलेल्या लोकांसाठी तर भाजलेले काजू हे पोषक तत्वांचा खजिना आहे. ते असंतृप्त चरबी, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे समृध्द असतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर नाश्त्यात भाजलेले काजू खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

ग्रील्ड पनीर

चीज वापरून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात, पण साखरेच्या रुग्णांसाठी ग्रील्ड पनीर हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही ते स्नॅक म्हणून खाऊ शकता. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि कार्बोहायड्रेट देखील कमी आहे, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. (Paneer Recipe)

इडली

इडली हा साऊथ इंडियन पदार्थ महाराष्ट्रीयन बनत चालला आहे. आज प्रत्येक मराठी घरात इडली पात्र असतंच. लेकीलाही संसारसेटमध्ये इडली भांड दिलं जातं. त्यावरूनच त्याची लोकप्रियता कळते.

हा अतिशय हलका आणि आरोग्यदायी नाश्ता आहे. वजन कमी करण्याच्या आहारात इडलीचा समावेश करणे देखील योग्य आहे. बाजरी, नाचणी किंवा ज्वारीच्या पिठापासून बनवलेली इडली मधुमेहामध्ये पौष्टिक आहे.

भेळपुरी

स्वादिष्ट भेळपुरी खायला कोणाला आवडणार नाही? साखरेचे रुग्णही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात. हा पदार्थ कमी वेळेत तुम्ही घरी बनवू शकता. भेळपुरीमध्ये चुरमुरे, कांदा, टोमॅटो, पापडी, फुटाणे डाळ, कोथिंबीर इत्यादीपासून बनवली जाते. ज्याला तुम्ही इच्छेनुसार तिखट,आंबट चव देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE: पुण्यात सलग तीन दिवस १० अंशांखाली तापमान

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT