Wedding Fashion esakal
लाइफस्टाइल

Wedding Fashion : जुनं ते सोनं.! म्हणत सोनाक्षीसह ‘या’ अभिनेत्रींनी स्वत:च्या लग्नात परिधान केल्या होत्या जुन्या साड्या, पाहा फोटो

Wedding Fashion : बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली.

Monika Lonkar –Kumbhar

Wedding Fashion : बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली. नोंदणी पद्धतीने रविवारी (२३ जून) हे कपल लग्नबंधनात अडकले. त्यांच्या विवाहाला दोघांचे आई-वडील, नातेवाईक आणि जवळचे मित्र-मंडळी उपस्थित होते. हा विवाहसोहळा पार पडल्यानंतर सोनाक्षीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

या फोटोंमधील सोनाक्षीचा सुंदर असा वेडिंग लूक सगळ्यांना प्रचंड आवडला. तिचा हा लूक समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. या फोटोंमध्ये सोनाक्षीने नेसलेली साडी आणि दागिने हे तिच्या आईचे होते. विशेष म्हणजे तिच्या आईची साडी ही ४४ वर्षे जुनी आहे.

आईच्या साडीत सोनाक्षी कमालीची सुंदर दिसत होती. आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत की, ज्यांनी सोनाक्षीप्रमाणे त्यांच्या लग्नात जुन्या साड्या परिधान केल्या होता.

सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या लग्नात तिची आई पूनम सिन्हा यांची ४४ वर्षे जुनी साडी नेसली होती. हीच साडी पूनम सिन्हा यांनी त्यांच्या लग्नात परिधान केली होती.

Sonakshi zaheer wedding

इतकेच नव्हे तर सोनाक्षीने तिची आईची ही साडी नेसून त्यावरील दागिने देखील आईचेच घातले होते. तिचा हा सिंपल सोबर लूक सगळ्यांना प्रचंड आवडला.

यामी गौतम

मागील काही दिवसांपूर्वीच आई झालेल्या अभिनेत्री यामी गौतमने कोरोना काळात अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले. परंतु, तिचा लग्नातील लूक प्रचंड गाजला होता. कारण, यामीने लग्नात तिच्या आईची साडी नेसली होती.

यामी गौतम

तसेच, साडीचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने सिल्क साडीसोबत मॅचिंग दुपट्टा देखील कॅरी केला होता. या संपूर्ण लूकमध्ये यामी खूपच सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे या साडीवर यामीने तिच्या आईचे पारंपारिक दागिने परिधान केले होते.

करिना कपूर-खान

बॉलिवूडची ‘बेबो’ अभिनेत्री करिना कपूर खान तिच्या उत्तम अभिनयासाठी आणि फॅशन सेन्ससाठी खास करून ओळखली जाते. करिनाने अभिनेता सैफ अली खानसोबत २९ एप्रिल २०१२ मध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला होता.

या लग्नात तिने ३ पिढ्यांचा अमूल्य ठेवा असलेला पोशाख परिधान केला होता. सैफची आजी बेगम साजिदा सुलतान यांनी त्यांच्या लग्नात जो शरारा परिधान केला होता. तोच शरारा करिनाची सासू अर्थात अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नात परिधान केला होता.

सैफची आई शर्मिला यांचा विवाह २७ डिसेंबर १९६८ मध्ये पतौडी कुटुंबातील सैफचे वडील नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबत झाला होता. त्यावेळी शर्मिला यांनी हाच शरार घातला होता. त्यानंतर, पतौडी घराण्याच्या परंपरेला अनुसरून करिनाने २९ एप्रिल २०१२ मध्ये तिच्या लग्नात हाच शरारा सूट परिधान केला होता. या शरारा सूटमध्ये करिना खूपच सुंदर दिसत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

Anil Parab : कदमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, अनिल परब यांचे प्रत्युत्तर; त्यांची ‘नार्को’ चाचणी करावी

SCROLL FOR NEXT