Sonakshi-Zaheer Wedding esakal
लाइफस्टाइल

Sonakshi-Zaheer Wedding: खूपच खास होता सोनाक्षीचा वेडिंग लूक, साडीसोबत आहे आईचे खास कनेक्शन..!

Sonakshi Sinha shared Wedding picture on Instagram: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत रविवारी (२३ जून) विवाहबंधनात अडकली.

Monika Lonkar –Kumbhar

Sonakshi-Zaheer Wedding : बॉलिवूडची दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच २३ जूनला (रविवार) तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाहबंधनात अडकली. या दोघांनी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट अंतर्गत लग्न केले. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केले.

हा नोंदणी पद्धतीने विवाह पार पाडल्यानंतर दोघांनीही संध्याकाळी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोनाक्षी आणि झहीर मागील ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यापासून सोनाक्षीचे चाहते तिच्या ब्रायडल लूकच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत होते.

अखेर तिचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. सोनाक्षीचा सिंपल सोबर वेडिंग लूक चाहत्यांना कमालीचा आवडला. सोनाक्षीने तिच्या लग्नात सुंदर साडी नेसली होती. तिची साडी आणि दागिन्यांनी चाहत्यांचे खास लक्ष वेधून घेतले होते. आज आपण सोनाक्षीचा वेडिंग लूक नेमका कसा होता? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

सोनाक्षीचा वेडिंग लूक

सोनाक्षीच्या वेडिंग लूकबद्दल बोलायचे झाल्यास, तिने तिच्या नोंदणीकृत विवाहाला सुंदर आयव्हरी रंगाची साडी नेसली होती. तिची ही साडी खास होती. कारण, तिच्या साडीवर चिकनकारी वर्क होते. विशेष म्हणजे सोनाक्षीने परिधान केलेली ही साडी तिची आई पूनम सिन्हा यांची होती. जी त्यांनी ४४ वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नात परिधान केली होती.

Sonakshi-Zaheer Wedding

पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा विवाहसोहळा ९ जुलै १९८० मध्ये झाला होता. त्यावेळी त्या लग्नात पूनम यांनी हीच साडी नेसली होती. आईची हीच सुंदर साडी सोनाक्षीने तिच्या लग्नात नेसली होती आणि दागिने ही तिने तिच्या आईचे परिधान केले होते. सोनाक्षीला मॅचिंग करताना झहीर देखील कमालीचा दिसत होता. त्याने चिकनकारी वर्कचा सुंदर कुर्ता घातला होता.  

ज्वेलरीने वेधले लक्ष

या सुंदर आयव्हरी रंगाच्या साडीवर सोनाक्षीने सुंदर नक्षीकाम असलेला कुंदन चोकर गळ्यात घातला होता. त्या सेटवरील मॅचिंग कानातले तिने घातले होते. तिच्या या कानातल्यांनी लूकला जणू चारचॉंद लावले होते. या साडीवर मॅचिंग असणाऱ्या गोल्डन रंगाच्या बांगड्या तिने हातात घातल्या होत्या.

Sonakshi-Zaheer Wedding

मिनिमल मेकअप अन् हेअरस्टाईल

सोनाक्षीने या आयव्हरी रंगाच्या साडीवर मिनिमल मेकअप केला होता. ज्यामुळे, ती अधिक सुंदर दिसत होती. मिनिमल मेकअपसोबत सोनाक्षीने केसांचा सुंदर स्लीक बन केला होता आणि त्यावर गजरा घातला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT