special story Oily hair care news 
लाइफस्टाइल

केसांना तेल लावताना चुकूनही या चुका करू नका;  नाहीतर पश्चाताप कराल

अर्चना बनगे

कोल्हापूर :  सुंदर लांबसडक आणि दाट काळसर केस हा प्रत्येक स्त्रीचा एक दागिना असतो. ही देणगी प्रत्येक स्त्रीला मिळतेच असे नाही म्हणून ती जपण्यासाठी अनेक महिला खुप प्रयत्न करत असतात. पण आज-काल केस गळती आणि केस पांढरे होणे या  समस्यांमुळे अनेक महिला त्रस्त आहेत. अनेक वेळा केस वाढण्यावसाठी आपण अनेक प्रयोग करत असतो. मात्र याचा फायदा न होता मोठ्या प्रमाणात तोटाच असतो.  त्यामुळे लांबसडक केस असण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी डायट बरोबर त्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. 

खूप वेळा आपण कळत नकळत अशा चुका करतो याचा फायदा होण्यापेक्षा नुकसानत जास्त होते आणि मग पश्चाताप करावा लागतो. चला तर जाणून घेऊया नेमक्या कोणत्या चुका होतात आणि त्या कशा सुधाराव्यात.


तेल लावताना असी घ्या काळजी

केसांच्या वाढीसाठी तेल खूप गरजेचे असते. मात्र नेहमीच केसांना तेल ठेवणे गरजेचे नसते. सतत आणि जास्त तेल लावल्यामुळे डोक्याची छिद्रे बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे तेल लावत असताना सतत डोक्याला न लावता फक्त केवळ केसांना  तेल लावावे. 

तेल लावण्याआधी केसांचा गुंता जरूर काढा

ज्या महिलांचे केस गळतात त्यांनी तेल लावण्यापूर्वी मोठ्या दातांच्या कंगव्याने केसांचा गुंता एकदा जरूर सोडवावा असं केल्यामुळे तेल लावून झाल्यानंतर केसांचा गुंता कमी होऊन केस तुटण्याची शक्यता कमी असते. केसांना तेल लावण्यापूर्वी केस मोकळे करून  घ्या. 


हलक्या हाताने करा केसांना मालीश

केस तुटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे केसांची मुळं कमकुवत असणे. त्यामुळे तेल लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तेल हे हलक्या हातानेच लावले गेले पाहिजे. ज्यामुळे केस कमकुवत होणार नाहीत आणि तुटणार नाहीत. तेल लावताना आणखी एक काळजी गरजेची असते. त्यासाठी केसांचे सेक्शन काढून घेऊन तेल लावावे. 


असे वापरा तेल 

डोक्याला मालिश करण्यासाठी तेल थंड न घेता ते नेहमी कोमट करून घ्यावे. कोमट तेल लावत असताना ते केसांच्या मुळापर्यंत सहज जाते आणि मालिश करण्यास मदत होते. तेल हे नेहमी रात्री लावावे व सकाळी केस धुवून घ्यावेत. 

तेल लावल्यानंतर असे बांधा केस

तेल लावून झाल्यानंतर केस घट्ट बांधू नका. घट्ट केस बांधल्यामुळे ते कमकुवत होतात. म्हणून रात्री झोपताना हलकी अशी वेणी बांधून घ्यावी. 

असा करा मसाज

तेल फक्त मुळांना लावून सोडून देऊ नका तर  पाच किंवा दहा मिनिटं हलका मसाज करा. यामुळे ब्लड सर्कुलेशन होण्यास मदत तर  होतेच आणि केसांना चांगले पोषण ही मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT