sport bra shopping tips 
लाइफस्टाइल

Sports Bra खरेदी करताय! या ११ गोष्टी ठेवा लक्षात

आजकाल साध्या ब्रा खरेदी करण्याबरोबरच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करणे महत्वाचे मानले जाते

सकाळ डिजिटल टीम

Bra Buying Guide: आजकाल साध्या ब्रा खरेदी करण्याबरोबरच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करणे महत्वाचे मानले जाते. जिमला जाताना, योगा करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी मुली वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स ब्रा वापरतात. मुलींना व्यायामाची गरज लक्षात घेऊन वेगळी ब्रा खरेदी करावी लागते. एकाच प्रकारची ब्रा प्रत्येक व्यायामाकरता वापरणे कठीण आहे. चुकीची सपोर्ट ब्रा घातली जाते तेव्हा मोठी समस्या निर्माण होते. चुकीची ब्रा घातल्याने तुम्ही अस्वस्थ तर व्हालच शिवाय कोणत्याही प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करू देणार नाही. त्यामुळे योग्य स्पोर्ट्स ब्रा निवडणे गरजेचे आहे.

sport bra

स्पोर्ट्स ब्रा कशी खरेदी कराल? (How to Buy a Sports Bra)

१) उडी मारणे, धावणे अशा प्रकारच्या व्यायामासाठी उच्च प्रभाव असलेल्या स्पोर्ट्स ब्रा घ्या. कारण यात तुमची बॉडी जास्त बाऊंस होते. हाय स्पोर्ट्स ब्रा हालचाली कमी करतात.

२) चालणे, हायकिंग करणे, एरोबिक्स, स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी मिडियम प्रभाव असलेली ब्रा खरेदी करता येईल.

३) पिलेट्स, योगा, चालणे, सायकलिंग करताना तुमचे शरीर कमी हाचलाल करतेय त्यामुळे लाईट सपोर्ट असलेली स्पोर्ट्स ब्रा घालता येईल.

bra size cup

४) ज्या मुलींचे ब्रेस्ट साईज (Breast Size) मोठे आहेत त्यांनी मीडियम आणि हाय इम्पेक्ट ब्रा (High Impact Bra) घालावी असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण त्या तुमची छाती पूर्ण कव्हर तर करतातच शिवाय तुम्हाला आरामदायी वाटते.

५) स्पोर्टस ब्रा खरेदी करण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टींची खास काळजी घ्या स्ट्रेप्स, कप्स आणि बेंड

६) तुम्ही ब्राच्या पट्ट्या आणि खांद्याच्यामध्ये दोन बोटे बसवू शकत आहात याची खात्री करा. असे झाले नाही तर, स्पोर्ट्स ब्राचे पट्टे तुमच्या खांद्याखाली यायला लागतील.

Bra washing

७) जर तुम्हाला योग्य कव्हरेज मिळत नसेल, तर याचा अर्थ ब्राचे कप लहान आहेत.

८) जेव्हा तुम्ही हात उंचावाल किंवा खाली वाकाल तेव्हा ब्राचा पट्टा वर यायला नको. योग्य स्पोर्ट्स ब्राचा पट्टा पाठीवर योग्य बसायला हवा.

९) स्पोर्ट्स ब्रा घट्ट होत नाहीये ना ते बघण्यासाठी ब्रा घालून दिर्घ श्वास घ्या. जर काही अडचण आली नाही तर ती घट्ट नाहीये असं समजा.

१०) स्पोर्ट्स ब्रा धुवण्यापूर्वी २०-३० मिनिटे साबण्याच्या पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर हलक्या हातांनी धुवा.

११) स्पोर्ट्स ब्रा ड्रायरपेक्षा हवेवर सुकेल असे बघा. त्याच्या इलास्टिकसाठी हे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT