straighten hair using aloe vera gel lifestyle marathi news 
लाइफस्टाइल

एलोवेरा जेल वापरून अशा पद्धतीने करा केसांना स्ट्रेट 

अर्चना बनगे

कोल्हापूर :  युवती आणि  स्त्रियांना आपल्या केसाची रचना आकर्षक असावी असे वाटते. केसांना स्ट्रेट करणे ही काही नवीन फॅशन नाही. परंतु महिलांमध्ये बीच स्ट्रेट ची फॅशन अद्यापही मोठी क्रेज आहे. बाजारामध्ये केस स्ट्रेट करण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर हेअर स्ट्रेटनर मशिनच्या साह्याने आपण घरी सुद्धा आपले केस स्ट्रेट करू शकतो.
परंतु केसामध्ये अधिक प्रमाणात केमिकलचा वापर आणि हिटिन्ग टेक्निक वापरल्यामुळे आपले केस नाजूक व रुक्ष होतात. यातून केस गळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू होते. अशा वेळी कोणतीही महिला आपल्या केसांचे नुकसान करू शकत नाही. परंतु आपल्या केसांना स्ट्रेट करण्याची जर जास्त हौस  असेल तर तुम्हाला या ठिकाणी एका नैसर्गिक उपचाराची माहिती देत आहोत


एलोवेरा जेल चे फायदे  

आपणास माहीतच आहेत. या जेलचा वापर आपण जास्त करून त्वचेसाठी करतो. परंतु हे जेल  आपण केसांसाठी सुद्धा वापरू शकतो. यामुळे केवळ केस स्ट्रेट होत नाहीत तर त्यापासून केसांनाही अनेक फायदे मिळतात.

आवश्यक साहित्य 
 ॲलोवेरा जेल एक  कप (आपल्या केसाच्या उंची नुसार आपण हे प्रमाण वाढवू शकतो) 
 अर्धा कप मध 
 एक मोठा चमचा खोबरेल तेल
*एक मोठा चमचा लिंबूचे रस

कृती
 
*एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल घ्या
*  यामध्ये मग चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या जेणेकरून त्याची चांगली पेस्ट तयार होईल 
* या मिश्रणामध्ये लिंबूचे रस आणि खोबरेल तेल मिक्स करा 
*आता आपल्या केसांचे सेपरेषन करा
* थोडे थोडे केस घेऊन त्याला हे मिश्रण लावा
*  मिश्रण लावल्यानंतर एक तास ते केसावऱ ठेवा
* त्यानंतर केस शाम्पूने धुऊन घ्या 
* जर तुम्ही एक आठवडा या उपायांचा वापर केला तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये नक्कीच फरक जाणवेल. 
* जर तुमचे केस खूपच कुरळे असतील तर तुमचे केस जास्त स्ट्रेट होणार नाहीत. परंतु केस नक्कीच मुलायम व चमकदार होतील.

केसांना एलोवेरा जेल लावण्याचे फायदे
* एलोवेरा जेल मुळे केसांची चांगली वाढ होते. त्याचबरोबर  त्वचेला जेल लावल्यानंतर त्याठिकाणी रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. 
* जर तुमच्या केसांना डेंड्रफ ची समस्या असेल तर एलोवेरा जेल सोबत लिंबूचा रस मिक्स करा त्यामुळे ही समस्या दूर होते 
* जर तुमचे केस अधिक गळत असतील  किंवा तुटत असतील तर यासाठी  एलोवेरा जेल उपयुक्‍त ठरतो.
* एलोवेरा जेल मध्ये सिस्टीन आणि लायसिन हे घटक असतात ते केस गळण्यापासून वाचवतात.
*एलोवेरा जेल केसांचा थीकनेसपणा वाढवतात याच बरोबर यामुळे केस सरळ दिसतात.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT