Fashion Tips esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : हळदीच्या लूकसाठी बेस्ट आहेत 'हे' फ्लोरल आऊटफिट्स, नक्की करा ट्राय

प्रत्येक मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस हा खूप खास असतो. या लग्नाच्या दिवशी आपण खूप सुंदर दिसावे असे मुलींना वाटते. यासाठी प्रत्येक तरूणी तिच्या लग्नातील प्रत्येक लूकसाठी खास तयारी करते.

Monika Lonkar –Kumbhar

Fashion Tips : प्रत्येक मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस हा खूप खास असतो. या लग्नाच्या दिवशी आपण खूप सुंदर दिसावे असे मुलीला वाटते. यासाठी प्रत्येक तरूणी तिच्या लग्नातील प्रत्येक लूकसाठी खास तयारी करते.

लग्नाच्या पूर्वी मेहंदी, संगीत आणि हळदीचे फंक्शन असते. या सर्व कार्यक्रमांमध्ये माझा लूक परफेक्ट आणि सर्वात सुंदर असावा असे देखील तरूणींना वाटते.

त्यासाठी मग विविध प्रकारचे आऊटफीट्स ट्राय केले जातात. आऊटफिटनुसार मग मेकअप, ज्वेलरी आणि हेअरस्टाईलची निवड केली जाते. लग्नापूर्वी पार पडणाऱ्या हळदीसाठी देखील अनेक ऑप्शन्स आहेत. जे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

आज आपण हळदीच्या लूकसाठी बेस्ट असणाऱ्या काही फ्लोरल डिझायनर आऊटफिट्सबद्दल जाणून घेणार आहोत.

फ्लोरल साडी लूक

हळदीच्या फंक्शनसाठी तुम्ही हा फ्लोरल साडी लूक नक्कीच ट्राय करू शकता. अभिनेत्री पूजा हेगडेने परिधान केलेली ही साडी हळदीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. या साडीवर नाजूक रंगीत फुलांची मस्त एम्ब्रॉयडरी केलेली दिसून येते.

अशाप्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. या प्रकारच्या साडीवर मोकळे केस आणि मस्त रंगीत फ्लोरल ज्वेलरी खूप उठून दिसेल.

हेव्ही लेहेंगा लूक

हळदीसाठी साडी आणि लेहेंगा परिधान करण्यावर तरूणींचा नेहमीच भर असतो. मात्र, हळदीसाठी हेव्ही लेहेंगा हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. अभिनेत्री अनन्या पांडेच्या या हेव्ही लेहेंग्यापासून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

हेव्ही लेहेंगा लूक

तिच्या लेहेंग्यावर पांढऱ्या फुलांचे मस्त एम्ब्रॉयडरी वर्क केलेले दिसून येत आहे. या प्रकारचा लेहेंगा किंवा या लेहेंग्याशी मिळताजुळता असणारा लेहेंगा तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. या प्रकारच्या लेहेंग्यावर मोकळे केस आणि मॅचिंग गोल्डन ज्वेलरी अधिक उठून दिसेल.

डिझायनर नेट साडी

आजकाल अनेक तरूणी हळदीमध्ये सिंपल पिवळी साडी परिधान करताना दिसतात आणि सध्या पिवळ्या रंगाच्या डिझायनर नेट साडीला अतिशय डिमांड आहे.

नेहमीच्या पारंपारिक साडीपेक्षा काहीतरी हटके तुम्हाला ट्राय करायचे असेल, तर ही डिझायनर नेट साडी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. या प्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT